शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांनो, हा माझा शेवटचा व्हिडिओ व्हायरल करा..! हिंजवडीत इमारतीवरून तरुणाची उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:32 IST

माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले, हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? इन्स्टाग्रामवर केला व्हिडीओ अपलोड

पिंपरी : 'मित्रांनो, हा माझ्या आत्महत्येचा व्हिडीओ आहे. व्हायरल करा', अशा मेसेजसह व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून तरुणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्याच्या दोघा मावसभावांना पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज- २ येथे १२ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडलेली ही घटना दोन महिन्यांनंतर पोलिस तपासात उघडकीस आली.तेजस बाजीराव सोनागरे (२०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक किशन हरिभाऊ कांदे यांनी शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) फिर्याद दिली. नीलेश ऊर्फ गोलू संजय पुंडे (२५) आणि मंगेश संजय पुंडे (२३, दोघेही रा. तळवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तेजस हिंजवडीतील खासगी कंपनीत नोकरीस होता.संशयितांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तेजसने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये आत्महत्येस नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे जबाबदार असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. तेजसच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, मामानेच त्याचा सांभाळ केला आहे. तेजस एकलकोंडा होता.  काय आहे व्हिडीओत ?तेजसने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केला. 'हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनो, तो जेवढा व्हायरल होईल, तेवढा व्हायरल करा. धिस इज माय सुसाइड व्हिडीओ. याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेन्टली खूप त्रास दिला जातोय. मी कामाला येतोय, मी माझी सॅलरी कमावतोय, ऑब्व्हीअसली मी जे सेव्हिंग करतोय, ते माझ्या स्वतःसाठी करतोय. माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले, हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? याला सगळ्यात मुख्य कारणीभूत आहेत, ते माझे दोन मावसभाऊ नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे. व्हिडीओ जेवढा व्हायरल करता येईल तेवढा प्लीज करा', असा व्हिडीओ तेजस यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याDeathमृत्यू