शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सफाई कर्मचाऱ्यांना आठवड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करा ; महापालिकेला आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:22 IST

महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत.

ठळक मुद्देसुमारे १६० हून अधिक तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे आदेश

पिंपरी : महापालिकेतर्फे सफाई कर्मचाºयांना सुरक्षा साधने, मास्क, हातमोजे, गमबुट, साबण, मोठे हातरुमाल, झाडू आणि इतर साहित्य तातडीने उपलब्ध करून द्या. महिला सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य कोठीत पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम येत्या सात दिवसांत उपलब्ध करा. याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिला आहे.    महापालिकेत काम करणाºया अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाºयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाºहाणे आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे मांडले आहे. त्यावर दिल्ली मुख्यालयात सुनावणी झाली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते. या वेळी दिलीप गावडे यांनी आयुक्त उपस्थित न राहिल्याबाबतची लेखी दिलगीरी पत्र सादर केले. महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. मास्क, हातमोजे, गमबुट, बारा साबण, सहा मोठे हातरुमाल, दरमहा दोन झाडू नियमितपणे दिले जात नाहीत. रेनकोट, स्वेटरचे वाटप योग्य वेळी केले जात नाही. महिला सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य कोठीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम उपलब्ध नाही. तक्रारकर्ता महिलांना अधिकारी अवमानकारक वागणूक देतात. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा नेमणुकीसाठी नेमलेल्या लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याकामी चालढकल केली जाते, अशा तक्रारी केल्या. तसेच, पुरावेही सादर केले.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी दिलीप गावडे यांना खुलासा करण्यास सांगितले. मात्र, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरात आजही सफाई कामगारांना हाताने मैला उचलावा लागतो. हाताने मैला उचलणे ही अमानवी पद्धत असून, असे काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करण्यासाठी या कामगारांचे व त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने २०१३ मध्ये कायदा केला आहे. मात्र, आजही अनेक भागात हाताने मैला साफ करण्याची अमानवी पद्धत अस्तित्वात असल्याची बाब लाजीरवाणी आहे. ही अमानवी प्रथा मोडीत काढा, सन २०१२ पासून ते आजतागायत सफाई काम करताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना काय मदत केली, त्याचा अहवाल सात दिवसांत पाठवावा, असे आदेशही दिले. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीने केलेल्या सुमारे १६० हून अधिक तक्रारींचे निवारण तातडीने करून जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून अहवाल आयोगाला सादर करावा, असेही आदेश देण्यात आले.   

...........................................

सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरकुले द्या  पिंपरी-चिंचवड महापालिकेने २५० हून अधिक सफाई कर्मचाºयांना मोफत घरकुलांपासून वंचित ठेवल्याचे म्हणणे अ‍ॅड.सागर चरण यांनी मांडले. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात येऊनही काणाडोळा झाल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. यावर सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची घरकुले तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिले. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच करावे, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणे