शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

‘वडे-पकोडे’तळून शासनाचा निषेध, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:00 IST

दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे भाजपा सरकारचे आंदोलन फोल ठरले. केंद्र शासनाच्या धोरणामुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत.

पिंपरी : दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे भाजपा सरकारचे आंदोलन फोल ठरले. केंद्र शासनाच्या धोरणामुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. सुशिक्षित तरुणांनी ‘पकोडे’ तळले, तरी त्यातून रोजगारनिर्मिती होते, असा सल्ला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चुकीची धोरणे राबविणाºया केंद्रातील भाजपा सरकारचा शहर राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध नोंदवला. निगडी प्राधिकरणातील चौकात कार्यकर्त्यांनी चक्क वडे-पकोडे तळले.निगडीतील लोकमान्य टिळक पुतळा चौकात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस शरद काळभोर, नीलेश पांढारकर, कुणाल थोपटे, योगेश गवळी, हर्षवर्धन भोईर, शेखर काटे, भागवत जवळकर, सुनील गव्हाणे, श्रीकांत धनगर, आलोक गायकवाड, मनोज वीर, सनी डहाळे, सतीश डोईफोडे, शिवराज रणवरे, चैतन्य चौरडिया, अमनजित दीपसिंग कोहली, साईश कोकाटे, श्रीरंग भोसले, प्रतीक नायगावकर, ऋषभ म्हेत्रे, मंगेश बजबळकर, हर्षद म्हेत्रे, हेमंतबडदे, आदित्य आडे, हेमल मूर्ती, अण्णा पिल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.रोजगारवाढीला आणि व्यवसायाच्या विकासाला मारक असे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे मागील चार वर्षांत ४५ टक्के रोजगारात घट झाली. नोटाबंदीमुळे छोटे उद्योग-व्यवसाय देशोधडीला लागले. नवीन रोजगार निर्माण करण्याऐवजी मोदी सरकार सुशिक्षित बेरोजगारांना ‘पकोडे’तळण्याचा सल्ला देत आहे.नवीन उद्योग, व्यवसायांतील कर्ज, अनुदान, शिष्यवृत्ती, शिक्षण क्षेत्रातील अनुदान कमी करून भांडवलदारांना कोट्यवधीचे कर्ज व अनुदान दिले जात आहे. दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, असे फसवे आश्वासन देणाºया भाजपा सरकारचा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसतर्फे तीव्र निषेध नोंदवत आहे, असे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी सांगितले. या वेळी युवकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेस