घरीच महिलांकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; दोन महिलांची सुटका

By रोशन मोरे | Updated: November 20, 2023 15:54 IST2023-11-20T15:53:10+5:302023-11-20T15:54:07+5:30

ही कारवाई रविवारी (दि. १९) एमआयडीसी भोसरी परिसरात करण्यात आली....

Prostitution to be done by women at home, accused arrested; Rescue of two women | घरीच महिलांकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; दोन महिलांची सुटका

घरीच महिलांकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; दोन महिलांची सुटका

पिंपरी : पैश्याच्या अमिषाने घरीच महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून दोघांवर गुन्हा दाखल केला. देविदास आप्पासाहेब हनवते (वय ५३, रा. वखारी, जि. जालना) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

ही कारवाई रविवारी (दि. १९) एमआयडीसी भोसरी परिसरात करण्यात आली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप भागवत शेप यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिद देविदास हा त्याच्या राहत्या घरी पैश्याच्या अमिषाने पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता.

या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी छापा टाकत पीडित दोन महिलांची सुटका केली. तसेच संशयित देविदास याला अटक केली. देविदासला साध देणाऱ्या एका महिलेसह पारधी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Prostitution to be done by women at home, accused arrested; Rescue of two women