परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 14:08 IST2021-07-08T14:08:47+5:302021-07-08T14:08:54+5:30
पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली आहे

परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी: परदेशी महिलांना फ्लॅटमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्या प्रकरणी एकाला अटक केरण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निलेश नरेश गोस्वामी (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा लक्ष्मीनगर पिंपळे गुरव येथे सृष्टी चौक ते राम कृष्ण मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या शिवमल्हार नावाच्या बिल्डींगमध्ये किशोर कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याने त्या फ्लॅटमध्ये चार परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी ठेवले.
त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. त्याद्वारे मिळालेल्या रकमेतून निलेशने स्वतःची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत निलेश याला अटक केली. त्याच्याकडून ८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.