पिंपरीतील स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 17:11 IST2021-10-13T17:04:48+5:302021-10-13T17:11:45+5:30
पिंपरी: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे ...

पिंपरीतील स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पिंपरी: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे यांच्या पथकाने पिंपरी येथे मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई केली.
याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक सुबराव गवारे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील डिलक्स मोबाईल मार्केट मॉलच्या पाचव्या मजल्यावर वेलनेस स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये आरोपी महिला दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात दोन महिलांची सुटका केली. तसेच स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला.