शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर, पाणीपट्टी भरा ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे

By admin | Updated: October 14, 2016 05:32 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने आता मोबाइल अ‍ॅप विकसित केले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने आता मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या आपल्या मोबाइलवरून अ‍ॅपद्वारे कर भरता येणार आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त दिनेश वाघमारे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत आदी उपस्थित होते. या अ‍ॅपद्वारे मालमत्ताधारक आपला मालमत्ता क्रमांक आणि पाणी बिलाचा क्रमांक नोंदवून मालमत्तेची आणि पाणीपट्टीची संपूर्ण माहिती पाहू शकतात. कराचा भरणाही करू शकतात. त्यामुळे यापुढे नागरिकांना महापालिका कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. २५ टक्के मिळकतधारक मालमत्ता कराचा भरणा आॅनलाइन करतात. हे अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वरुन ‘एम-पीसीएमसी’ या नावाने डाऊनलोड करता येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. अंजली भागवत यांच्यासह ५६ जणांचा समावेश होता. सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. प्रास्ताविक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. तर उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)