कैद्यांच्या हातांनी केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:31 AM2018-11-16T00:31:56+5:302018-11-16T00:32:22+5:30

२० लाखांची विक्री : दिवाळीनिमित्त भरविले वस्तूंचे प्रदर्शन

Prices are done by prisoners | कैद्यांच्या हातांनी केले मालामाल

कैद्यांच्या हातांनी केले मालामाल

Next

राहुल गायकवाड

पुणे : गेल्या १० वर्षांपासून पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन दिवाळी निमित्त भरविण्यात येते. यंदा ३० आॅक्टोबर रोजी उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनात केवळ एका आठवड्यात विक्रमी अशी २० लाख ५७ हजार ९०६ रुपयांची विक्री झाली आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आयुष्यात अंधकार असलेल्या कैद्यांच्या जीवनात एक आशेचा किरण यानिमित्ताने आला आहे.

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून कारागृहात विविध कामे करुन घेतली जातात. कपड्यांपासून ते खाण्याच्या वस्तूंपर्यंत अनेक वस्तू हे कैदी तयार करत असतात. खास दिवाळी निमित्त आकर्षक आकाशकंदील तसेच पणत्या इतर शोभेच्या वस्तू कैदी तयार करत असतात. गेल्या 10 वर्षांपासून येरवडा येथील कारागृहाच्या शोरुममध्ये या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. वषार्नुवर्षे या प्रदर्शनाला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. यंदा 30 आॅक्टोबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेते नागेश भोसले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कारागृह मुख्यालयाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार आदी उपस्थित होते. यंदा दिवाळीत सुरु करण्यात आलेल्या या प्रदर्शनात अवघ्या एका आठवड्यात प्रदर्शनातील वस्तूंची तब्बल २० लाख ५७ हजार ९०६ रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षी १५ लाख इतके होते. यंदा त्यात जवळजवळ साडेपाच लाखांची वाढ झाली आहे. यंदा या प्रदर्शनात सर्वाधिक लाकडी फर्निचर, हॅन्डलूमची कापडी उत्पादने व पर्यावरणपूरक आकाशकंदील
यांची मोठ्याप्रमाणावर विक्री झाली आहे.

कैदी शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर त्यांना एक उत्पादनाचे साधन निर्माण व्हावे, तसेच त्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करता यावा या हेतूने कारागृहात कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा मोबदलाही त्यांना दिला जातो. कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते.
 

Web Title: Prices are done by prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.