शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ, आपत्तीनिवारण कक्ष सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:25 PM

नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देस्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य, अग्निशमन अशा सर्वच विभागांना सूचना

पिंपरी  : पिंपरी चिंचवड शहराची जीवयदायिनी असलेल्या पवना धरणाच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून साडेचार हजार क्सुसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे पवना नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाची तातडीची बैेठक झाली. प्रशासनाने सर्व प्रभाग आणि अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याची सूचना केल्या आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण परिसरातही पाऊस वाढला आहे.पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग वाढत आहे. सुमारे साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपत्तकालीन परिस्थिती ओढावू नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने या संदभार्तील बैठक घेतली. सर्व संबधित विभागांना यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबत सुचना केल्या आहे. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष सुरू केला असून नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा. स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य, अग्निशमन अशा सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत.  बैठकीस  शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, शिक्षण समिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, आशा राऊत, विजय खोराटे, श्रीनिवासदांगट, मनोज लोणकर, मंगेश चितळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, संदेश चव्हाण, दिपक सुपेकर, देवन्ना गटटूवार, संजय भोसले, शशिकांत मोरे, प्रविण घोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, वायरलेस इन्चार्ज थॉमस नरोना, आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते.संपर्क क्रमांकमध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष ०२०-६७३३१५५६ व ३९३३१४५६, मुख्य अग्निशमन केंद्र १०१, ०२० - २७४२३३३३, २७४२२४०५, ९९२२५०१४७५अ क्षेत्रीय कार्यालय २७६५६६२१, २७६४१६२७, ९९२२५०१४५३, ९९२२५०१४५४ब क्षेत्रीय कार्यालय २७५०१५३, ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६क क्षेत्रीय कार्यालय २७१२२९६९, ९९२२५०१४५७,९९२२५०१४५८.ड क्षेत्रीय कार्यालय २७२७७८९८, ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०.ई क्षेत्रीयकार्यालय २७२३०४१०, २७२३०४१२, ८६०५७२२७७७फ क्षेत्रीय कार्यालय २७६५०३२४,८६०५४२२८८८ग क्षेत्रीय कार्यालय ७७८७८६८५५५, ७८८७८७९५५५ह क्षेत्रीय कार्यालय २७१४२५०३, ९१३००५१६६६, ९१३००५०६६६.सजगता बाळगण्याचे नागरिकांना आवाहन १) पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी एकमेंकांना सहकार्य करुन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच पवना, इंद्रायणी आणि मुळा या नदीकाठच्या क्षेत्रातील रहिवाशांनी सतर्क राहून स्वत:हुन पर्यायी ठिकाणी अथवा संक्रमण शिबारामध्ये स्थलांतरीत होवून जीवित व वित्त हानी टाळावी. २) पावसाळयात ओल्या रस्त्यावरुन विशेषत:  वळणावर वाहन नियंत्रित वेगाने व सावकाश चालवावे. ३) पावसापासून बचाव करण्यासाठी झाडे तसेच पडक्या इमारती, भिंती, जाहिरात फलक,मोबाईल टॉवर यांच्या जवळपास थांबू नये. वीज चमकताना झाडाखाली थांबू नये. ४) घरातील विजवाहक तारा तसेच विदयुत उपकरणे यांची तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी. पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डीपी बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विद्युत वाहकठिकाणी संपर्कात येवू नये. तसेच अशा ठिकाणी जनावरे जावू देऊ नये व बांधू नये. ५)  नाल्यातुन आणि पुलावरुन पाणी वाहत असताना जावू नये. पुराच्या वाहत्या पाण्यात उतरु नये. ६) पावसाळयात पूर स्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वास्तव्य करु नये. ७) औदयोगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करु नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात. त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravetरावेतmavalमावळriverनदी