Women Abuse: महिलेच्या फोटोचा गैरवापर करून तयार केले अश्लील व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:01 IST2022-02-25T15:00:29+5:302022-02-25T15:01:52+5:30
अश्लील व्हिडीओ देखील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला

Women Abuse: महिलेच्या फोटोचा गैरवापर करून तयार केले अश्लील व्हिडीओ
पिंपरी : महिलेच्या फोटोचा गैरवापर करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना २२ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान बावधन येथे घडली. संबंधित महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९८३६०३२१९, ७५६८०२५७७, ७३०५४७६९८३ या क्रमांकावरील व्यक्ती आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना त्यांनी स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशन मधून कर्ज घेतले होते. त्यानंतर ते कर्ज त्यांनी व्याजासहित परत केले. त्यांनतर स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशनच्या तीन मोबाईल नंबरच्या व्यक्तींनी आणि महिलेने फिर्यादीच्या चेह-याचा वापर करून त्यांचा अश्लील फोटो तयार केला.
हा फोटो त्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवून त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवला. त्याचबरोबर फिर्यादी यांचे पॅनकार्ड आणि आधारकार्डचा वापर करून आरोपींनी फिर्यादी यांचा अश्लील व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ देखील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हंटले आहे.