शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

राजकीय गुन्हेगारीचा बिमोड आणि तडीपार गुंडाचा बंदोबस्त करा: श्रीरंग बारणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 3:39 PM

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढाऱ्यांसोबत वावर असतो.

ठळक मुद्दे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची घेतली भेट तडीपार केलेले गुन्हेगारांचे राजरोसपणे शहरात वास्तव्य पिंपरी पोलीस ठाण्यासमोरच अवैध धंदे जोमात सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढाऱ्यांसोबत वावर असतो. या गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असून, यामुळेच शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासाठी पोलिसांनी अगोदर राजकीय गुन्हेगारीचा बिमोड करावा, राजकीय हस्तक्षेपाला आळा घालावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची भेट घेतली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अ‍ॅड. ऊर्मिला काळभोर, अनंत कोºहाळे, भरत साळुंखे, सजेर्राव मारमोरे, उमेश रजपूत, रामदास केंदळे शिष्टमंडळात होते.खासदार बारणे म्हणाले, राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यानेच शहरातील सामूहिक गुन्हेगारी वाढली आहे. राजाश्रय मिळत असल्याने गुंडांची दहशत वाढली आहे. यामुळे औद्योगिक पट्ट्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे हा राजाश्रय मोडीत काढणे गरजेचे आहे. राजाश्रय मोडीत काढल्याशिवाय शहरातील गुन्हेगारी कमी होणार नाही. तडीपार केलेले गुन्हेगार राजरोसपणे शहरात वास्तव्य करतात. वाकड, थेरगाव परिसरात सर्रासपणे तडीपारांचा वावर आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अवैध धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडितेला पोलिसांकडून योग्य वागणूक दिली जात नाही. औद्योगिकनगरीची ओळख पुसली जाऊ लागली असून बलात्कार, गुन्हेगारांची नगरी अशी ओळख होऊ लागली आहे. आमदार चाबुकस्वार म्हणाले, पिंपरी पोलीस ठाण्यासमोरच अवैध धंदे जोमात सुरू आहेत. दारू, मटक्यांचे अड्डे चालतात. पोलिसांना अवैध धंद्यांची संपूर्ण माहिती असूनही त्यांच्याकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, गुन्हेगारी रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, गुणवत्तेवर अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात आहेत. गुणवत्ताधारक पोलिसांचा हेतू चांगला राहील. तडीपार गुंडाची माहिती काढण्यात येत आहे. त्यांच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता असून, केवळ दीड हजार कर्मचारी आहेत. यामध्ये आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी