पिंपरीत चार ठिकाणी पोलिसांचा छापा; एक लाखांचा २ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:28 PM2021-06-24T17:28:45+5:302021-06-24T17:29:56+5:30

पिंपरी-चिंचवड पोलीसांनी आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात छापे मारले

Police raids four places in Pimpri; More than 2 kg of drugs worth Rs 1 lakh seized | पिंपरीत चार ठिकाणी पोलिसांचा छापा; एक लाखांचा २ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त

पिंपरीत चार ठिकाणी पोलिसांचा छापा; एक लाखांचा २ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त

Next
ठळक मुद्देमागील आठवड्यापासून पिंपरी - चिंचवड शहरात अनेक गांजा विक्रीच्या घटना घडू लागल्या आहेत.

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीसांनी आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात छापे मारले आहेत. यामध्ये एक लाख ११ हजार १०० रुपये किमतीचा दोन किलोपेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे. 

आळंदी पोलिसांनी खेड तालुक्यातील गोलेगाव येथे छापा मारून एका ६२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. दिगंबर रघुनाथ चौधरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी कडून ४८ हजार रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भोसरी येथील मुस्लीम शाही कब्रस्तान गेट समोर ५२ वर्षीय व्यक्तीला सापळा लावून पकडले. राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय ५२ , रा. भोसरी ब्रिज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून २१ हजार ८०० रुपये किंमतीचा ८८२ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे निगडी पोलिसांनी कारवाई करून एकास अटक केली. निलेश नंदेश्वर चव्हाण (वय ३५ , रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बेकायदेशीररित्या एक किलो २९८.५ ग्रॅम वजनाचा ३५ हजार ७५० रुपये किंमतीचा गांजा जवळ बाळगला होता. पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे.

निगडी परिसरात आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ओटास्कीम निगडी येथे कारवाई करून पाच हजार ५५० रुपयांचा २२२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अहमद रजा वाशीउज्जमा खान (वय ३४ , रा. निघोजे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Police raids four places in Pimpri; More than 2 kg of drugs worth Rs 1 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.