शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

अनधिकृत आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 01:05 IST

आठवडे बाजाराच्या नावाखाली भाजी आणि फळविक्रेत्यांनी रावेत प्राधिकरणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाण मांडले होते.

रावेत - आठवडे बाजाराच्या नावाखाली भाजी आणि फळविक्रेत्यांनी रावेत प्राधिकरणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाण मांडले होते. हा अनधिकृत बाजार वाहतुकीस अडथळा ठरत होता. त्यामुळे येथे उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत निगडी वाहतूक विभागाने कारवाई केली. विक्रेत्यांना भर चौकात विक्री करण्यास मनाई करून कारवाई करण्यात आली.विक्रेत्यांनी भर चौकात रस्त्यावरच अनधिकृतपणे आठवडे बाजार भरविण्यास सुरुवात केली होती. बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहनचालक, यामुळे वाहतूककोंडी होते.रावेत प्राधिकरणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. रस्ता प्रशस्त असूनही आठवडे बाजारामुळे शनिवारी येथे मोठ्या प्रमाणात कोंडी होते.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्षवाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी चौकातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु विक्रेते त्यांना कारवाई न करण्याची विनंती करीत होते. वाहतूक विभागाला विक्रेत्यांची हातगाडी अथवा माल जप्त करण्याचे अधिकार नसल्याने कर्मचारी केवळ त्यांना चौकातून हुसकावून लावत होते. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागास काही नागरिकांनी कळविले. परंतु कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी फिरकले नाहीत.शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यापासून रावेत परिसर निगडी वाहतूक विभागास जोडला आहे. रावेत परिसरात होणारी नित्याची वाहतूककोंडी थांबविण्यात आम्हाला यश मिळाले आहे. परंतु प्रत्येक शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजी आणि फळ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे येथे वाहतूककोंडी होते. त्यामुळे गेल्या शनिवारपासून आमच्या विभागाचे कर्मचारी चौकात विक्रेत्यांना थांबण्यास मज्जाव करीत आहेत.- अर्जुन पवार, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, निगडीचौकातील अथवा इतर ठिकाणी होणारे अतिक्रमण काढण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे आहे. विनाअडथळा वाहतूक सुरळीत करणे हे वाहतूक विभागाचे काम आहे. आम्हाला नाईलाजास्तव येथे विक्री करण्यासाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव करावा लागत आहे. आमच्याकडे अधिकार नसल्याने विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करता येत नाही. परंतु वाहतुकीस अडथळा ठरणाºया विक्रेत्यांवर आम्ही दंडात्मक कारवाई करीत आहोत.- संजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग, निगडीपूर्ण शहरासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे केवळ एकच पथक उपलब्ध आहे. एका वेळी केवळ आठ ते दहा पोलीस या विभागाकडे उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यास अडचण निर्माण होत आहे. या आठवड्यात अतिक्रमण निर्मूलन पथक ब प्रभागाकडे घेऊन रावेत येथील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता,बांधकाम परवानगी व अतिक्रमण निर्मूलन विभाग, ‘ब’ प्रभाग

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड