पिंपरी : गतवर्षाला निरोप आणि नवनवर्षाचे स्वागत या निमित्ताने थर्टी फर्स्टच्या ओल्या पार्ट्या करून परतणाऱ्या ११९ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. निगडी, चिंचवड, चाकण, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, देहुरोड,तळवडे अशा विविध ठिकाणी ब्रिथ अनालायरच्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली असता, त्यात मद्य प्राशन करून वाहन चालविणारे आढळुन आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती वाहतुक पोलिसांनी दिली. थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत:च्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने हॉटेलांमध्ये मोठ मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिक आनंद साजरा करतात. मात्र या आनंदाला, उत्साहाला गालबोट लागू नये. याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पोलिसांनी दिल्या होत्या. थर्टी फर्स्टच्या रात्री प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर, चौकात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पुणे शहरातून पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांना वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रिथ अनालायझर उपकरण देण्यात आली होती. त्या उपकरणाच्या माध्यमातून पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांंची तपासणी केली. निगडीत ६, चिंचवडमध्ये १०, चाकण ३, भोसरी १९, पिंपरी १६, हिंजवडी ५३, देहुरोड ९, तळवडे ३ अशा मिळुन एकुण ११९ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली. रविवारी पोलिसांनी १२७ मद्यपी वाहनचालनकांवर कारवाई केली होती
पिंपरी-चिंचवड परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री ११९ मद्यपींवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:12 IST
थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत: व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते.
पिंपरी-चिंचवड परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री ११९ मद्यपींवर पोलिसांची कारवाई
ठळक मुद्देपुणे शहरातून पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदीपुणे शहरातून पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी