शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

गहुंजेच्या स्टेडियमवर भारताकडून ‘इंडिया’ ला धक्का!

By विश्वास मोरे | Updated: August 23, 2022 16:16 IST

नारीशक्ती व ‘लोकमत’चा पाठपुरावा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असलेल्या गावात पहिल्यांदाच धावली बस

डाॅ. विश्वास मोरे / देवराम भेगडे

गहुंजे : ज्या गावात गगनचुंबी इमारती आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ शेजारी आहे, त्याच गावात क्रिकेट स्टेडियमही आहे. या स्टेडियमवर रंगला जगावेगळा सामना. 'भारत विरुद्ध इंडिया' या संघर्षात भारतातील रणरागिणी जिंकल्या. इंडियाकडे सगळ्या सुविधा आहेत. भारत मात्र मागे आहे.  तिकडे पार्किंगच्या जागेचा प्रश्न आहे. इकडे गावात बस येत नाही. महिला-मुलींना चालत जावे लागते. या प्रश्नाला नारीशक्तीने वाचा फोडली. 'लोकमत'ने पाठपुरावा केला आणि भारत जिंकला. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी प्रथमच गहुंजे गावात धावली पीएमपी बस. आणि मग एकच जल्लोष झाला.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील शेवटचे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील गहुंजे हे गाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या माध्यमातून जागतिक नकाशावर पोहोचले आहेत. या गावात सार्वजनिक बस व्यवस्था नव्हती. त्यामुळे नागरिकांना स्वत:च्या गाडीने किंवा रिक्षाने बाहेरगावी जावे लागत होते. त्यामुळे गैरसोय होत होती. याबाबत लोकमतने दाेन वर्षांपूर्वी ‘स्वातंत्र्य मिळाले मात्र, गावात पोहोचली नाही एसटी’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच याबाबत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही बसची मागणी केली होती. तरीही प्रयत्नांना यश येत नव्हते. त्यानंतर गावातील विविध बचतगटांतील महिलांनी एकजूट केली आणि थेट पीएमपीला धडक दिली. पाठपुरावा केला. महिलांच्या प्रयत्नांना यश आले. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गावातून पहिली बस धावली. ग्रामदैवतेच्या मंदिरासमोर बस उभी केली होती. मोहक फुलांच्या माळांनी बस सजवली. श्रीफळ वाढवून आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते बस सुरू झाली. माजी नगरसेविका संगीता शेळके, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, बसच्या पहिल्या वाहक विजयमाला चाटे, उत्तम भालेराव, निर्गुण बोडके, पूजा बोडके, उषा बोडके, कांता बोडके, उत्तम बोडके, हेमंत जोशी, उमेश बोडके, मनोज बोडके, ग्रामसेवक तानाजी  ओलेकर यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

प्रगती आणि महिला स्वातंत्र्याची सुरूवात

महिला जे ठरवितात. ते करून दाखवितात, नारी शक्तीचे हे उत्तम उदाहरण आहे. बचत गटांतील महिलांनी एकत्र येऊन प्रयत्न केले आणि बस सुरू झाली. ही प्रगतीची सुरुवात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज गहुंजेत खऱ्या अर्थाने सर्वांच्या एकजुटीने साजरा झाला. ही प्रगतीची आणि महिला स्वातंत्र्याची सुरुवात आहे. - संजय आवटे, संपादक, लोकमत

गहूंजेतील भारत आणि इंडिया

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत गहुंजे गाव आहे. पवना नदीच्या तीरावर वसलेल्या या गावांमध्ये ग्रामपंचायत आहे. स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडच्या सीमेवर हे गाव असतानाही विकासापासून काही अंशी वंचित राहिले आहे. या गावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम झाले आहे. तसेच सिंम्बायिसिससारखे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लोढा, महिंद्रा, गोदरेज या सारखे नामांकित गृहप्रकल्प येथे आल्याने गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. तसेच तसेच बांधकाम क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या व्यावसायिकांचे महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प साकारले जात आहेत. त्यामुळे गावाची ओळख आता उपनगर म्हणून होऊ लागली आहे. गावाची एकजूट विकासकामात दिसून येत आहे.

''गावातील महिला बचतगटांच्या माध्यमातून बस सुरू केली, महिला काय करू शकते. तिने एक मनावर गोष्ट घेतली ती करून दाखविते. याचे हे उदाहरण आहे. - सारिका शेळके''''बस सुरू करण्याचे ठरल्यानंतर काय करायचे. येथेपासून तयारी केली. ऑफिस शोधण्यापासून महिला बचत गटांच्या महिलांनी धावपळ केली. पीएमपीच्या ऑफिसमध्ये गेलो. अनेक वेळा पाठपुरावा केला.  - मेघा बोडके''''गहुंजे गावात यापूर्वी एसटी, पीएमपी अशी कोणतीही बस येत नसल्याने गैरसोय होत होती. खेटा मारल्या आणि आता बस सुरू झाली.  - कांता बोडके''''आज आनंदाचा दिवस आहे.  शाळेत कॉलेजला जाणारी मुलांना सोय नसल्याने नुकसान होत होते. महिला बचत गट महिलांनी निर्णय घेतला आणि त्यातून बस सुरू झाली. - पूजा बोडके''

बचतगटांच्या प्रयत्नांना आले यश निर्गुण बोडके यांनी प्रास्ताविकात महिलांच्या लढ्यामागील कथा सांगितली. तसेच महिलांच्या प्रयत्नांचे काैतुक केले. ‘‘सुवर्णअक्षरांनी लिहावी असा क्षण आहे. महिलांनी बससाठी घेतलेल्या प्रयत्नांना यश आले आहे, असेही ते म्हणाले. त्यानंतर सारिका शेळके यांनी एका महिलेने ठरविले तर काय करू शकते, हे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेIndependence Dayस्वातंत्र्य दिनPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीSocialसामाजिक