शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अपुऱ्या, अनियमित बसफे-यांमुळे हाल, पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 01:13 IST

पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे.

पिंपरी : पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. बस फे-या पुरेशा आणि नियमित उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.शहरातून स्वारगेट, पुणे स्टेशन, कात्रज, हडपसर, कोथरूड, बालेवाडी, विश्रांतवाडी, आळंदी, वारजे माळवाडी, वाघोली, राजगुरूनगर, चाकण, कोंढवा, मनपा असा प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. मात्र पीएमपी बस कधीच वेळेवर येत नाही. एकाच मार्गावर बसच्या अनेक फेºया बºयाच वेळा काही ठरावीक मार्गावर लवकर बस उपलब्ध होत नाहीत. यामुळे प्रवाशांना मात्र तासंतास ताटकळत बसावे लागते. दोन-दोन तासांनी बस आली तर बस खचाखच भरलेली असते. प्रवाशांना बसच्या बाहेर लटकत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.पीएमपीच्या मुख्य बसथांब्यांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. हॉटेल किंवा अन्य विक्रेत्यांकडून प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागते. प्रत्येक प्रवाशांना ते सहज शक्य नसते. काही बसथांब्यांजवळ दुकाने, हॉटेल जवळ नाहीत. अशा बसथांब्यांवरील प्रवाशांचे पाणी नसल्याने हाल होतात.बसची अवस्था दयनीयशहरातून धावणाºया बसपैकी बहुतांश बस अक्षरश: मोडकळीस आलेल्या आहेत. दरवाजा लगतचे पत्रे उखडलेले, तुटलेले आपत्कालीन दरवाजे गायब झालेले, आसन व्यवस्थेमधील खुर्च्या तुटलेल्या आहेत. खुर्च्यांच्या दुरवस्थेमुळे पत्र्यात किंवा खिळ्यात अडकून प्रवाशांचे कपडे फाटल्याचे प्रकारही घडत आहेत. अशा अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. बसचालकांच्याही खुर्चीचीही अशीच दुरवस्था झाल्याचे दिसून येते. फुटलेले आरसे, गियरचे तुटलेले रॉड, प्रचंड उष्णता यामुळे चालकाला बस चालवताना मोठी कसरत करावी लागते.दररोज पाच ते सात बसचे ‘ब्रेक डाऊन’आर्थिक अडचणीत अडकलेल्या पीएमपीचे ‘ब्रेक डाऊन’चे ग्रहण सुटताना दिसत नाही. रोज पिंपरी-चिंचवडमध्येच पाच ते सात पीएमपी बसचे ‘ब्रेक डाऊन’ होत आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांना होतो. बंद पडलेली बस सोडून दुसरी बस पकडायची यामध्ये प्रवाशांचा जास्त वेळ जातो. त्याचप्रमाणे रोज होणाºया ‘ब्रेक डाऊन’मुळे बसच्या फेºयादेखील कमी होतात.स्वच्छतागृहांचा अभावपिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीचे काही मुख्य बसथांबे आहेत. काही बसथांबे ‘स्टार्टिंग पॉर्इंट’ आहेत. अर्थात तेथून बस मार्गस्थ होतात. अशा मुख्य बसथांब्यांवरून रोज प्रवासासाठी ये-जा करणाºयांची संख्या मोठी आहे. त्यामध्येही महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. मुख्य बस थांब्यावर बहुतांशवेळा बसची प्रतीक्षा करावी लागते. अशा वेळी स्वच्छतागृह नसल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होते. शहरातील काही मोजक्याच बसथांब्यांवर स्वच्छतागृह आहेत. वर्दळीच्या बसथांब्यांवर मात्र स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येते.वादावादी रोजचीचपीएमपीच्या सर्व बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना आरक्षण दिले आहे. मात्र ‘हाजीर तो वजीर’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. बहुतांश बसमध्ये महिलांना उभा राहून प्रवास करावा लागत आहे. महिलांच्या आरक्षित जागांवर पुरुष ठाण मांडून असतात. त्यामुळे होणारे वाद हे रोजचेच झाले आहेत. दिव्यांगांच्या आरक्षित आसनावर इतर प्रवासी बसलेले असतात.पीएमपीच्या बस फेºयांमध्ये नेहमीच अनिमितता असते. बहुतांशवेळा बस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. तसेच प्रवासात जास्त वेळ जातो. इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी लवकर निघूनही उपयोग होत नाही. अनेक थांब्यांवर न थांबताच चालकांकडून बस दामटण्यात येतात. बस कधी बंद पडेल हेदेखील सांगता येत नाही.- यामिनी चौधरी, प्रवासीपीएमपीने प्रवास करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे बहुतांश प्रवाशांना उभा राहूनच प्रवास करावा लागतो. बस कमी असल्याने फेºया कमी आणि अनिमित होतात. परिणामी प्रत्येक बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते, असे असतानाही नाईलाजास्तव पीएमपीने प्रवास करावा लागतो.- सचिन लोखंडे, प्रवासी

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे