पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
By प्रकाश गायकर | Updated: December 27, 2024 16:36 IST2024-12-27T16:35:16+5:302024-12-27T16:36:19+5:30
पीएमपी बस चालक भोसरी ते वासुली ही बस घेऊन भोसरी येथून वासुली येथे जात होते.

पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : वाहतूककोंडी असल्याने बस हळू चालवत असलेल्या पीएमपी बस चालकाला दोघांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी पावणेआठ वाजता खेड तालुक्यातील बिरदवडी येथे घडली. संकेत परमेश्वर कांबळे (वय २४, रा. खराबवाडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच १४/एलडब्ल्यू ७५५५) वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बस चालक आहेत. ते भोसरी ते वासुली ही बस घेऊन भोसरी येथून वासुली येथे जात होते. बिरदवडी येथे वाहतूककोंडी असल्याने कांबळे त्यांच्या ताब्यातील पीएमपी बस हळूहळू चालवत होते. त्यावेळी पाठीमागून एका दुचाकीवरून दोघे जण आले. त्यांनी दुचाकी बसला आडवी लावली. त्यानंतर कांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.