शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

पिंपरी महापालिकेच्या लेखापरीक्षणातील ३०१० कोटींच्या आक्षेपाची पीएमओकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 7:17 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परीक्षणाबाबत १९९९ मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्देपंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख राजीव रंजन यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांना निर्देश न्यायालयाच्या आदेशानुसार १८ वर्षांचे लेखापरिक्षण याप्रकरणी दखल घेऊन उचित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना

पिंपरी : महापालिकेच्या लेखापरीक्षणातील आक्षेपांची, न झालेल्या कार्यवाहीची पीएमओ कार्यालयाकडून दखल घेतली आहे. ३८ हजार ३१८ या एकुण आक्षेपाधीन ३०१० कोटींबाबत चौकशीची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख राजीव रंजन यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांना दिले आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयास कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परीक्षणाबाबत १९९९ मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार १८ वर्षांचे लेखापरिक्षण केले होते. लेखापरिक्षणातील आक्षेपाधीन रकमेबाबत काय कारवाई करणार याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. याबाबत भापकर यांनी आक्षेपाबाबत तक्रारी दिल्या मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.त्यामुळे महापालिकेच्या लेखापरिक्षणातील ३९१० कोटींच्या गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून कायद्याप्रमाणे कारवाई करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती.  लेखापरीक्षणातील आक्षेपाबाबत कार्यवाही न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, वसूलपात्र रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, याबाबत उच्च स्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी भापकर यांनी केली होती. त्यानुसार पीएमओ कार्यालयाने राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. तसेच याप्रकरणी दखल घेऊन उचित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाह पाठविण्याच्या सूचना राजीव रंजन यांनी सरकारला केल्या आहेत.  मारूती भापकर म्हणाले, लेखापरिक्षणाबातील आक्षेपाबाबत महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यास दिरंबाई केली जात आहे. आयुक्तांनी केवळ नोटीसा काढणे, वेतनवाढ रोखणे एवढ्या किरकोळ कारवाया केल्या आहेत. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालू नये, दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच याची उच्चस्तरीय चौकशी करावी. ...........................................एकुण आक्षेपाची संख्या १२,२३,४४३निरस्त आक्षेप संख्या ८५,१२५प्रलंबित आक्षेप संख्या ३८,३१८एकुण आक्षेपाधीन रक्कम ४,३४१.१८० कोटीनिरस्त आक्षेपाधीन रक्कम १३३ कोटीप्रलंबित आक्षेपाधीन रक्कम ३,०१० कोटीवसूलपात्र रक्कम १,०६५ कोटीनिरस्ते वसूलपात्र आक्षेपाधीन रक्कम ४९८ कोटीप्रलंबित वसूलपात्र ५६७ कोटीरेकॉड तपासणीतून उपलब्ध न झालेली रक्कम ३९८ कोटररेकॉर्ड तपासणी कामे उपलब्ध निरस्त रक्कम ४५३ कोटीप्रलंबित रेकॉर्ड तपासणी उपलब्ध न झालेली रक्कम ३,५३० कोटी

टॅग्स :Puneपुणेprime ministerपंतप्रधान