पिंपरीत पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:40 IST2021-06-09T18:40:18+5:302021-06-09T18:40:26+5:30
पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा यापूर्वी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरीत पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे कोरोनाने निधन
पिंपरी: पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे कोरोनाने निधन झाले. पिंपरी -चिंचवड शहर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा यापूर्वी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हा पाचवा बळी ठरला.
बाळकृष्ण मारूती नरळे (वय ४९), असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नरळे यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना २९ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोना तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना वानवडी येथील सदर्न कमांड रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते दिघी आळंदी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.