Pimpri Chinchwad: आठ किलो गांजा विकायला आला सापळ्यात अडकला; माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:35 IST2024-02-14T13:35:26+5:302024-02-14T13:35:58+5:30
पिंपरी : विक्रीसाठी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख २९ हजार ४५० रुपयांचा आठ किलो ...

Pimpri Chinchwad: आठ किलो गांजा विकायला आला सापळ्यात अडकला; माल जप्त
पिंपरी : विक्रीसाठी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख २९ हजार ४५० रुपयांचा आठ किलो ५६९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. पिंपरीतील वल्लभनगर बसस्थानकाबाहेर सोमवारी (दि. १२) रात्री पावणेएकच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
बायला अनसिंग किराडे (४०, रा. धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रसाद दंगीलवाड यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किराडे हा विक्रीकरिता त्याच्या ताब्यात चार लाख २९ हजार ४५० रुपयांचा आठ किलो ५६९ ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन आला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी गांजा व मोबाइल जप्त केला.