शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Ashadhi Wari 2024: पोलिसांनी शक्कल लढवली; वारकरी वेशात पालखी सोहळ्यात सहभाग, तब्बल साडे चार हजार पोलीस तैनात

By नारायण बडगुजर | Updated: June 25, 2024 18:38 IST

Ashadhi Wari 2024 वारीच्‍या काळात गर्दीचा गैरफायदा घेत अनेक चाेरटे या गर्दीत मिसळून मोबाइल, पाकीट, सोन्‍याचे दागिने लंपास करतात, हि बाब लक्षात घेऊन पोलीस अलर्ट मोडवर

पिंपरी : जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासाठी (Ashadhi Wari 2024) प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा निर्विघ्‍नपणे पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्‍त असणार आहे. यात पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी टेहळणी मनोरे (टाॅवर) उभारण्यात येणार आहेत. यावरून पालखी सोहळ्यातील गर्दीवर पोलिसांचा ‘वाॅच’ राहणार आहे.

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi) २८ जून रोजी तर श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी (sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा २९ जून रोजी प्रस्‍थान करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी राज्‍यातूनच नव्‍हे तर देशाच्‍या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येत असतात. वारीच्‍या काळात गर्दीचा गैरफायदा घेत अनेक चाेरटे या गर्दीत मिसळून मोबाइल, पाकीट, सोन्‍याचे दागिने लंपास करतात. यामध्‍ये महिला चोरट्यांचाही सहभाग असतो. ही बाब लक्षात घेऊन साध्‍या आणि वारकर्‍यांच्‍या वेशातही पोलिस पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 

गर्दीमध्ये एखादा संशयित दिसला की त्‍याला लगेच ताब्‍यात घेण्‍यात येणार आहे. तसेच परिसरातील रेकॉर्डवरील गुंडांवरही प्रतिबंधात्‍मक कारवाई केली जात आहे. वारीवर लक्ष ठेवण्‍यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी टेहळणी मनोरे (टॉवर) उभारले आहेत. या टाॅवरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांकडून देखील गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

स्थानिक पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही बंदोबस्ताच्या सूचना केल्या आहेत. गर्दीत कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास तत्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी गर्दीमध्ये साध्या वेशातील पोलिस देखील राहणार आहेत.  - संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त    

असा आहे पोलिस बंदोबस्‍त

पोलिस उपायुक्‍त : ६सहायक पोलिस आयुक्‍त : १७पोलिस निरीक्षक : १०३सहायक निरीक्षक /उपनिरीक्षक : ३४५अंमलदार : ३,४५९आरसीपी पथक : ५एसआरपीएफ : ३ कंपन्‍यास्‍ट्रायकिंग फोर्स : ३जलद प्रतिसाद पथक (क्‍यूआरटी) : १एनडीआरएफ तुकडी : २ बाॅम्ब शोधक, नाशक (बीडीडीएस) पथक : ४

टॅग्स :Puneपुणेdehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022