शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri-Chinchwad Police: पिंपरी-चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारांना दणका; ४७ सराईतांवर तडीपार कारवाई, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:03 IST

एमपीडीए व तडीपार कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली असून, भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसआयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिस उपायुक्तांच्या चारही परिमंडळांतर्गत जानेवारी २०२६ या महिन्यात एकूण ४७ सराईत गुन्हेगारांवर तडीपार/हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन सराइत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात ही व्यापक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

एमपीडीएअंतर्गत दोन गुन्हेगार स्थानबद्ध

चाकण उत्तर व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेले रजीत लक्ष्मण येरकर (वय १९, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) व रामदास मारुती साळुंके (वय ३७, रा. आंबेठाण, ता. खेड) या दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्यांना अनुक्रमे येरवडा व नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

चार परिमंडळांत मोठी तडीपार कारवाई

परिमंडळ १ मध्ये १०, परिमंडळ २ मध्ये ९, परिमंडळ ३ मध्ये १७, तर परिमंडळ ४ मध्ये ११ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर व काही प्रकरणांत रायगड जिल्ह्यातील हद्दीतून ठरावीक कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेले हे गुन्हेगार २० ते ५० वयोगटातील असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारीवर पोलिसांचे कडक धोरण

एमपीडीए व तडीपार कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली असून, भविष्यातही गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. तडीपार केलेले गुन्हेगार हद्दीत आढळल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

पोलिस आयुक्तालयांतर्गत ४०० गुन्हेगारांवर वाॅच

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत चार परिमंडळांतर्गत २४ पोलिस ठाणे आहेत. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ४०० पेक्षा जास्त गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Police Crackdown: 47 Criminals Banned; What's the Reason?

Web Summary : Pimpri-Chinchwad police have banned 47 criminals to curb crime. Two were detained under MPDA. The action targets those involved in serious offenses. Police are monitoring over 400 criminals.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्तArrestअटकSocialसामाजिक