pimpri chinchwad : प्रारूप प्रभाग रचनेवर तीन दिवसांत दोन हरकती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:06 IST2025-08-26T12:04:05+5:302025-08-26T12:06:50+5:30
प्राप्त हरकती प्रभाग ८ आणि प्रभाग २१ मधून आल्या आहेत. प्रभाग ८ मध्ये इंद्रायणी नगरला संतनगर नाव जोडण्याची मागणी करण्यात आली आहे

pimpri chinchwad : प्रारूप प्रभाग रचनेवर तीन दिवसांत दोन हरकती
पिंपरी : महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २२) प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या रचनेविरुद्ध नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत हरकती देण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, प्रारूप रचना जाहीर झाल्यापासून तीन दिवसांत आतापर्यंत केवळ दोन हरकती प्राप्त झाल्या आहेत.
प्राप्त हरकती प्रभाग ८ आणि प्रभाग २१ मधून आल्या आहेत. प्रभाग ८ मध्ये इंद्रायणी नगरला संतनगर नाव जोडण्याची मागणी करण्यात आली आहे, तर प्रभाग २१ मध्ये अनुसूचित जाती, जमाती तसेच आदिवासी मतदारांची संख्या असल्यामुळे त्या प्रभागाला मागासवर्गीय प्रभाग म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेची ही प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्पा नसून लोकांचा अभिप्राय घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.