शहरं
Join us  
Trending Stories
1
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
4
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
5
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
8
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
9
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
10
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
11
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
12
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
13
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
14
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
15
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
16
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
17
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
18
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
19
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
20
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election : जागावाटपावरून महायुतीत चढाओढ; वाटाघाटीत गुंतागुंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:19 IST

- शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला हवेत बालेकिल्ल्यांचे प्रभाग : २०१७ च्या पार्श्वभूमीवर संघर्ष वाढला; भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) यांच्यातील चर्चांना वेग

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील घटक पक्षांतील जागा वाटपाचा तिढा वाढत चालला आहे. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) यांच्यातील चर्चांना वेग आला असला तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या बालेकिल्ल्यांवर ठाम दावा केल्याने वाटाघाटी गुंतागुंतीच्या बनल्या आहेत.

महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपने १२८ पैकी ७७ जागा जिंकत एकतर्फी वर्चस्व मिळवले होते. राष्ट्रवादीला ३५ जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला नऊ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या विजयाच्या जोरावर भाजपने यंदा सर्व प्रभागांत लढणार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचे, बालेकिल्ल्यांचे प्रभाग मिळावेत, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे जशा निवडणुका जवळ येतील, तशी चढाओढ वाढणार आहे. राजकीय गणिते बदलल्याने उमेदवार निवड किचकट

पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार ते आयटी प्रोफेशनल, तरुण मतदार ते ज्येष्ठ नागरिक, गावठाण ते नव्या गृहप्रकल्पांतील नागरिक असा मतदार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेली फूट, नवी आरक्षण सोडत यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली असून काही पारंपरिक प्रभाग महिलांसाठी, अनुसूचित जातींसाठी किंवा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाल्याने उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. या बदलांचा परिणाम महायुतीच्या जागावाटप चर्चेवर दिसून येत आहे. 

राष्ट्रवादी-शिंदे सेनेला सत्ता सहभागाचा आधार

स्थानिक नेत्यांचे प्रभावक्षेत्र, गटबाजी तसेच चिंचवड, आकुर्डी, भोसरी, सांगवी, पिंपळे सौदागर या भागांतील सामाजिक गणित लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष आपापली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट मात्र मोठे दावे करत आहे. शहरातील काही भागात राष्ट्रवादीचे पारंपरिक, सामाजिक व स्थानिक नेटवर्क अजूनही मजबूत आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये २०१७ चे निकाल कमजोर असले तरी २०२५ मध्ये नवीन गणित उभे राहू शकते, असा पक्षाला विश्वास आहे. शिंदे सेनेने राज्यातील सत्ता सहभागाचा आधार घेत काही प्रतिष्ठेच्या जागांची मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षानेही (आठवले गट) १५ जागांवर दावा सांगितला आहे.

जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला

महायुतीकडून आगामी काही दिवसांत अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र मित्रपक्षांच्या मागण्या, संघटनात्मक दबाव आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेतली तर वाटाघाटी अजून काही काळ लांबतील, अशी चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीचा अंतिम निर्णय कोणत्या दिशेने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance struggles for seat sharing in municipal elections; talks complex.

Web Summary : Pimpri-Chinchwad's ruling alliance faces seat-sharing challenges ahead of municipal elections. Each party insists on key areas, complicating negotiations. Political shifts and reservation changes add complexity. All eyes are on the final decision.
टॅग्स :PuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक