शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election 2026: आज प्रचारतोफा थंडावणार; निवडणूक प्रचाराला सायंकाळी पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:50 IST

प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी केली शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी: प्रशासन आणि उमेदवारांसाठी दोन दिवस महत्त्वाचे 

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा मंगळवारी (दि. १३) थंडावणार आहेत. नियमानुसार मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार थांबवला जातो. त्यानंतर कुणालाही प्रचार करता येणार नाही. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. प्रचाराची वेळ संपल्यानंतर उमेदवारांना घरभेटी मात्र करता येतील. शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा जोर शहरात रॅली काढून प्रचारावर राहणार आहे. सायंकाळी ५:३० वाजता प्रचार संपणार असल्याने जाहीर सभा दुपारीच आटोपण्यावर पक्ष व उमेदवारांचा भर आहे.

निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, जाहीर प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांकडे एकच दिवस शिल्लक आहे. या काळात प्रत्यक्ष जाहीर प्रचार करता येणार नसला तरी गाठीभेटी घेणे, मतदारांशी संपर्क वाढवून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांना आता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दुसरीकडे जाहीर प्रचार संपल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, पथकांना सजग केले आहे. काही प्रभागात हाय व्होल्टेज लढत होत असल्याने राज्यभरातील दिग्गज मंडळी तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच शिंदेसेना - भाजपचे नेतेही पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रचारसभेच्या माध्यमातून आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जाणार आहेत.

 पथकांची वाढली जबाबदारी

जाहीर प्रचार थांबल्यानंतर दोन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. या काळात आचारसंहिता भंग होण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे गैरकृत्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे या काळात होणाऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची भूमिका पथकांना घ्यावी लागेल. दोन्ही दिवशी रात्री गस्त वाढवली जाणार असून, शहरातील प्रमुख मार्गावरून धावणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

वाहनांची परवानगीही संपणार

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार बंद करायचा आहे. त्यामुळे, अधिकृत प्रचार मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५:३० वाजेपासून बंद होईल. त्यानंतर राजकीय पक्षांना प्रचारासाठी असलेल्या वाहनांची परवानगी संपणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या सभा, बैठका आणि स्पिकरद्वारे होणारा प्रचार बंद राहील.

निवडणूक विभाग सज्ज

गुरुवारी होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होणारी बूथ कमिटी तयार झाली असून, त्यांचे पुन्हा प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. बुधवारी (दि. १४) या सदस्यांना मतदानाचे साहित्य वितरीत केले जाणार आहे. शहरांमध्ये एकूण ३४ भरारी पथके व ३४ एसएसटी पथके कार्यरत असून, या सर्वांची अशा घटनांवर २४ तास नजर राहणार आहे. 

मकर संक्रांतीनिमित्त वाणांचे आमिष दाखवू नये

राजकीय पक्षांचे नेते उमेदवार, कार्यकर्ते सण - उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्तीगतरित्या सहभागी होऊ शकतात. तथापि या सण - उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्यांनी अथवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये अथवा त्यासाठी कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये. मकर संक्रांतीचा सण येत असल्याने महिलांना वाण देण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष, उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी वस्तूंचे, पैशांचे वाटप करू नये.  - सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमुख

English
हिंदी सारांश
Web Title : PCMC Election 2026: Campaigning Ends Today; Voting on January 15th

Web Summary : PCMC election campaigning concludes today, January 13th. Voting is on January 15th. Political rallies end, door-to-door visits allowed. Authorities increase vigilance to prevent code of conduct violations, especially during Makar Sankranti celebrations.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६PuneपुणेElectionनिवडणूक 2026