शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

यंदाचा अर्थसंकल्पही ‘प्रशासकीय राजवटीत’च;महापालिका निवडणूक लांबल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:28 IST

शहराच्या प्रगतीची गती दर्शविणारा महापालिकेचा सलग तिसरा अर्थसंकल्प प्रशासक मांडणार आहेत.

पिंपरी : महापालिकेचा २०२५-२६चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या दृष्टीने सर्व विभागांनी माहिती पाठविण्याचे पत्र पाठविले आहे. विविध कारणांनी निवडणुका लांबल्याने लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकांच्या हाती तीन वर्षांपासून कारभार आहे. त्यामुळे शहराच्या प्रगतीची गती दर्शविणारा महापालिकेचा सलग तिसरा अर्थसंकल्प प्रशासक मांडणार आहेत.महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे पुढील वर्षभरात होणाऱ्या शहराच्या विकासाचा आरसा असतो. साधारणपणे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सप्टेंबरपासून सुरू होते. त्यामध्ये दहा लाखांपर्यंतची कामे सामान्य नागरिकांनाही सुचविता येतात. त्यांची पडताळणी होऊन आवश्यक असलेल्या कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला जातो. शिवाय, आठही प्रभाग स्तरावरील कामांचा समावेशही त्यामध्ये असतो. त्यासाठी स्वतंत्र तरतूद असते. विभागांकडून माहिती मागविण्याचे काम सुरूमहापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी विविध विभाग व क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती मागविली जाते. सर्व माहिती संकलित झाल्यानंतर स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला जातो. स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा होते. स्थायीचे सदस्य काही हरकती व सूचना सुचवितात. त्यांचा समावेश करून अंतिम अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडला जातो. सभेची मंजुरी मिळाल्यानंतर एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली जाते. फेब्रुवारीत अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोणते नवीन प्रकल्प असतील, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी किती तरतूद असेल, याची माहिती असेल. तेच सादर करणार, तेच स्वीकारणारमहापालिकेमध्ये २०१७ मध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. कोरोना काळातील प्रतिबंध, ओबीसी आरक्षणाचा तिढा, बदललेली राजकीय परिस्थिती अशा विविध कारणांनी वेळेत अर्थात निवडणूक होऊ शकली नाही. परिणामी, १४ मार्च २०२२ पासून राज्य सरकारने आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. स्थायी समिती अध्यक्षपद आणि सर्वसाधारण सभा पीठासन अधिकारीपदही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे २०२५-२६चा अर्थसंकल्पही प्रशासकच स्वीकारतील.सिंह यांनीच सादर केले तीनही अर्थसंकल्प...लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत संपण्यापूर्वी अर्थात फेब्रुवारी २०२२ मध्ये तत्कालीन स्थायी समिती कारभाऱ्यांनी आयुक्तांकडून २०२२-२३ चा अर्थसंकल्प स्वीकारला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी प्रशासक म्हणून आयुक्तांनीच केली होती. २०२३-२४ चा अर्थसंकल्प प्रशासक शेखर सिंह यांनीच मांडला व स्वीकारला होता. आता सलग तिसरा अर्थात २०२४-२५ चा अर्थसंकल्प आयुक्त शेखर सिंह मांडणार असून, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून स्वीकारणारही आहेत.दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प (कोटी रुपयांत)वर्ष - रक्कम२०२२-२३ : ६४९७२०२३-२४ : ७१२७२०२४-२५ : ८६७६

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्याBudgetअर्थसंकल्प 2024