Pimpri-Chinchwad: ब्लेड दाखवून पाचशे रुपयांची मागणी; पैसे न दिल्याने पेव्हर ब्लॉकने मारहाण

By नारायण बडगुजर | Updated: June 14, 2023 17:14 IST2023-06-14T17:13:25+5:302023-06-14T17:14:26+5:30

रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली...

Pimpri-Chinchwad: Demand Rs 500 by showing blade; Beating with paver blocks for non-payment | Pimpri-Chinchwad: ब्लेड दाखवून पाचशे रुपयांची मागणी; पैसे न दिल्याने पेव्हर ब्लॉकने मारहाण

Pimpri-Chinchwad: ब्लेड दाखवून पाचशे रुपयांची मागणी; पैसे न दिल्याने पेव्हर ब्लॉकने मारहाण

पिंपरी : ब्लेड दाखवून पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र, तरुणाने पैसे दिले नाहीत. त्याचा राग मनात धरून दोघांनी तीन जणांना विटा व पेव्हर ब्लॉकने मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. चिंचवड स्टेशन जवळील पुलाखाली सोमवारी (दि. १२) रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

रणजीत राजू शेट्टी (वय २८, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १३) निगडीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तुषार ऊर्फ सनी सुरेश गायकवाड (वय २४, रा. चिंचवड) व आदेश ऊर्फ भैय्या बप्पा ऊर्फ सुरेश गायकवाड (वय २३, रा. चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ व एक मित्र हे तिघे पुलाखाली बसले असताना आरोपी दुचाकीवरून आले त्यांनी फिर्यादीचा मावस भाऊ साईप्रसाद याच्याकडे ५०० रुपये मागितले. यावेळी साईप्रसादने पैसे दिले नाहीत याचा राग येऊन आरोपींनी पेव्हर ब्लॉक व विटांनी मारहाण केली. फिर्यादीचा मित्र तेथे वाचविण्यास गेला असता त्याला देखील मारहाण केली, असे फिर्यादित नमूद आहे.

Web Title: Pimpri-Chinchwad: Demand Rs 500 by showing blade; Beating with paver blocks for non-payment