पिंपरी : ग्लोरिया सॉफ्टवेअर पार्क या कंपनीच्या जागेत दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून कामगारांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी वाकड येथे घडली.वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर साळवी, बबलू वाघमारे, शैलेश वाघमारे, रुपेश वाघमारे, कुणाल वाघमारे, दिलीप वाघमारे, एक महिला आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित महेंद्र सोनावणे (३४, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.आरोपींनी फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी आणि इतर कामगारांना मारहाण केली. जागेला केलेल्या कंपाउंडची आरोपींनी तोडफोड केली. पाण्याचे कॅन आणि इतर वस्तूंची नासधूस केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
कंपनीच्या जागेत अतिक्रमण करत कामगारांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:02 IST