Pimpri Chinchwad Crime : जेवणावरून पत्नीशी भांडणाऱ्या पतीने मित्राच्या हाताला चावा घेत उपटले नख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 16:38 IST2021-06-05T16:37:52+5:302021-06-05T16:38:20+5:30
जेवणात एक अंडे कमी वाढले, या कारणावरून आरोपी व त्याच्या पत्नीचे भांडण सुरू होते.

Pimpri Chinchwad Crime : जेवणावरून पत्नीशी भांडणाऱ्या पतीने मित्राच्या हाताला चावा घेत उपटले नख
पिंपरी : जेवणात एक अंडे कमी वाढले या कारणावरून पत्नी सोबत भांडण केले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मित्राच्या हाताच्या बोटाला चावा घेत नख उपटून काढले. यात मित्र गंभीर जखमी झाला. हिंजवडी येथे गुरुवारी (दि. ३) रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
चंद्रकांत दत्तात्रय अभंग (वय ३३, रा. हिंजवडी), असे गंभीर जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ४) फिर्याद दिली आहे. मनोज सर्वजीत सिंग (वय ३५, रा. भुसवडी जोनपुरीता, सानगंज, जि. आजमगड, उत्तर प्रदेश), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे मित्र आहेत. फिर्यादी हे आरोपी यांच्याकडे जेवणासाठी गेले. त्यावेळी जेवणात एक अंडे कमी वाढले, या कारणावरून आरोपी व त्याच्या पत्नीचे भांडण सुरू होते. फिर्यादी हे भांडण सोडवण्यासाठी गेले. आरोपीला फिर्यादी पाठीमागून कवळी घालून ओढत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या हाताच्या बोटास जोराने चावा घेतला. तसेच बोटावरील नख कट करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. सहाय्यक फौजदार वसंत फडतरे तपास करीत आहेत.