शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीमुळे विषय मागे घेण्याची पिंपरी आयुक्तांवर नामुष्की;अडीच कोटी रुपयांच्या शालेय साहित्य खरेदीवर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 20:34 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका 

ठळक मुद्देमहापालिका स्थायी समितीची तहकूब सभा झाली गुरुवारी सकाळी२ कोटी ४३ लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव

पिंपरी : शिक्षण समितीतील अर्थपूर्ण गैरव्यवहारामुळे दोन महिने थेटपणे साहित्य खरेदीचा विषय रखडला. महापालिका शाळा सुरू नसतानाच महापालिकेने जुन्याच आदेशाने अडीच कोटी रुपयांचे शालेय साहित्य खरेदीवर स्थायी समिती सभेत आक्षेप घेण्यात आला. यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने शिक्षण समितीमुळे विषय मागे घेण्याची नामुष्की आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर आली आहे.महापालिका स्थायी समितीची तहकूब सभा गुरुवारी सकाळी झाली. विषयपत्रिकेवर पुरवठादारांकडून मागील आदेशान्वये चित्रकला, प्रयोग, नकाशा वही, विविध अभ्यासपुरक पुस्तके, १ कोटी ११ लाख ८० हजार ७१५ आणि १ कोटी ३१ लाख ४१ हजार ७१० रुपयांच्या वह्या, असे २ कोटी ४३ लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव होता. कोरोनामुळे पालिकेच्या शाळा बंद आहेत. अशा वेळी जुन्याच पुरवठादारांकडून आणि जुन्याच दराने, आदेशान्वये शालेय साहित्य खरेदी कशासाठी? याबाबत स्थायी समितीत राष्टÑवादीचे नगरसेवक मयूर कलाटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच विरोधी पक्षनेते नाना काटे यांनीही थेटपणे खरेदी करू नये, विषय रद्द करावा, अशी मागणी केली होती.

शिक्षणाधिकाऱ्यांना उत्तरे देता येईनात करारनामा, पुरवठा आदेश कोणत्या नियमांच्या आधारे केला? असे करारनामे, आदेश करण्यात येतात का? या केलेल्या पुरवठा आदेशास पुनर्प्रत्ययी आदेश म्हणता येते का? असे प्रश्न मयूर कलाटे यांनी उपस्थित केले. थेटपणे खरेदीला विरोध दर्शविला तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना सदस्यांनी कोंडीत पकडले. त्यांना उत्तरेही देता आली नाहीत. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलगिरी व्यक्त करीत शालेय साहित्य खरेदीचे विषय मागे घेतले.मयूर कलाटे म्हणाले, ‘‘प्रशासन चुकीचे प्रस्ताव मान्यतेसाठी आणत आहे. कोणाच्या सांगण्यावरून प्रशासन चुकीचे विषय आणत आहे. दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येत आहे. यावरून प्रशासन नेमके कोणाला पाठीशी घालत आहे. कुंपणच शेत खात आहे.’’राहुल कलाटे म्हणाले, ‘‘महापालिका शाळांच्या साहित्य खरेदीस विरोध नाही. परंतु निविदा प्रक्रिया करून खरेदी करणे गरजेचे आहे. थेटपणे काम देणे चुकीचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण मंडळात तेच तेच ठेकेदार आहेत. त्यामुळे स्पर्धा होत नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस