पिंपरीत गुंड गजानन मारणेच्या नावाने धमकी देत सावकारी करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:56 IST2021-05-28T17:56:04+5:302021-05-28T17:56:10+5:30

व्याजाचे पैसे परत न दिल्याने ठेवले होते एकाला कोंडून

Pimpri-based goon arrested for threatening to kill Gajanan | पिंपरीत गुंड गजानन मारणेच्या नावाने धमकी देत सावकारी करणाऱ्याला अटक

पिंपरीत गुंड गजानन मारणेच्या नावाने धमकी देत सावकारी करणाऱ्याला अटक

ठळक मुद्देमुद्दलाचे पैसे कधी देणार असा दम दाखवून मारहाणही केली

पिंपरी: गजा मारणे कोण माहिती आहे का? यांची मिरवणुक आम्हीच काढली होती, शितोळेचे हात कोणी तोडले माहित आहे का ? अशी धमकी देऊन मारहाण करणारा आणि सावकारी करणार्‍याला सांगवी पोलिसांनीअटक केली आहे.

प्रविण बबन थोरात (वय ३४, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी श्रीराम किनगे (वय ५२, रा. पवारनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

किनगे हे फिल्ट रिपेअरिंगचे काम करतात. त्यांनी २०१८ मध्ये प्रविण थोरात याच्याकडून १० टक्के व्याजाने ४० हजार रुपये घेतले होते. त्याचे व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाहीत. तसेच मुद्दलाची रक्कम परत द्यावी. यासाठी प्रविण याने किनगे यांना शिवीगाळ करुन त्याच्या घरात कोंडून ठेवले. तुला आता येथेच कोंडुन ठेवतो़, तुझे तंगडे तोडतो, असा दम देऊन त्यांना मारहाण केली.

तसेच गज्या मारणे कोण आहे माहिती आहे का? त्याची मिरवणुक आम्हीच काढली होती. तसेच शितोळेचे हात कोणी तोडले होते माहित आहे काय ? अशी फिर्यादीच्या मनाला भिती दाखवून माझे मुद्दलाचे पैसे कधी देणार असा दम दिला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रविण थोरात याला अटक केली आहे.

 

Web Title: Pimpri-based goon arrested for threatening to kill Gajanan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.