पिंपरी : मोशी येथील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्नीशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 23:52 IST2022-04-07T23:51:43+5:302022-04-07T23:52:04+5:30

मोशी येथील देऊ आळंदी रस्त्यावरील एका कंपनीत गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली.

Pimpri A fire broke out at a chemical company in Moshi 25 vehicles of fire brigade at the spot | पिंपरी : मोशी येथील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्नीशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी

पिंपरी : मोशी येथील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्नीशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी

पिंपरी : मोशी येथील देऊ आळंदी रस्त्यावरील एका कंपनीत गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. रात्री पावणे नऊच्या सुमारास अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या २५ पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कंपनीत केमिकल बॅरल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. 

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कंपनीत ऑईल असल्याचेही सांगण्यात येत आहे. आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाल्यानं मोठे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

Web Title: Pimpri A fire broke out at a chemical company in Moshi 25 vehicles of fire brigade at the spot