महापालिकेच्या लोकअदालतीत ५ कोटींची थकबाकी वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:15 IST2025-09-20T15:15:36+5:302025-09-20T15:15:53+5:30

- पाणीपट्टी आणि मालमत्ता कर : आकुर्डीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयासह आठही क्षेत्रीय कार्यालयात लोकअदालत

pimpari-chinchwad water bill and property tax dues of Rs 5 crore recovered in Municipal Corporation Lok Adalat: Lok Adalats in all eight regional offices including the civil and criminal courts in Akurdi | महापालिकेच्या लोकअदालतीत ५ कोटींची थकबाकी वसूल

महापालिकेच्या लोकअदालतीत ५ कोटींची थकबाकी वसूल

पिंपरी : महापालिकेच्या वतीने थकीत पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या वसुलीसाठी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली होती. त्यात पाच कोटींची थकबाकी वसूल झाली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष व आकुर्डी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत झाली.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत पाणीपट्टी व मालमत्ता कर थकबाकीदारांना ऑनलाइन नोटिसा पाठवल्या होत्या. लोकअदालतीमध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता कराशी संबंधित एकूण ३ हजार ४२४ प्रकरणे निकाली निघाली असून, तब्बल ५ कोटी १४ लाख १६० रुपयांचा महसूल मिळाला.

थकबाकीदारांकडून झालेली वसुली

- २ हजार ४८१ पाणीपट्टी थकबाकीदारांकडून ३ कोटी १४ लाख १९ हजार रुपयांचा कर वसूल.

- ९४३ मालमत्ता कर थकबाकीदारांकडून २ कोटी २ हजार रुपयांचा मालमत्ता कर संकलित.

- यामध्ये ८३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात मालमत्ता कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ.

- ‘अ’ प्रभागातील पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी आकुर्डी फौजदारी व दिवाणी न्यायालय व क्षेत्रीय कार्यालयात आयोजन.

- इतर प्रभागातील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी कर संकलन विभागीय कार्यालय या ठिकाणी लोकअदालतीचे आयोजन.

- या लोकअदालतीसाठी थकबाकीदारांना थकबाकी ऑनलाइन पद्धतीने तसेच जवळच्या विभागीय कार्यालयात / क्षेत्रीय कार्यालयात भरण्याची सुविधा. 
 

लोकअदालतीत मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल झाली असून, महापालिकेच्या महसुलात मोठी वाढ करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम खूप महत्त्वाचे ठरतात. यापुढेही प्रत्येक थकबाकीदारापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अधिक प्रभावी मोहिमा राबवणार आहोत. तसेच वारंवार संधी देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. – प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: pimpari-chinchwad water bill and property tax dues of Rs 5 crore recovered in Municipal Corporation Lok Adalat: Lok Adalats in all eight regional offices including the civil and criminal courts in Akurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.