चिंचवड-आकुर्डी रस्त्यावर बसवर झाड कोसळले;अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:35 IST2025-07-03T10:35:27+5:302025-07-03T10:35:53+5:30
- वाहतूक सुरळीत, प्रवासी किरकोळ जखमी

चिंचवड-आकुर्डी रस्त्यावर बसवर झाड कोसळले;अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य
पिंपरी : चिंचवड-आकुर्डी मार्गावर पीएमपीएमएल बसवर बुधवारी (दि.२) झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे काही काळासाठी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती आणि प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाने मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण येथून दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना केल्या. अग्निशमन जवानांनी काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले.
काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या घटनेत एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले. अग्निशमन विभागाच्या वेळीच झालेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
घटनास्थळी पोहोचताच आम्ही सर्वप्रथम प्रवाशांची सुरक्षितता तपासली. तत्काळ झाड हटवण्याचे काम सुरू केले आणि काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. वेळेवर प्रतिसाद दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. - गौतम इंगवले, उपअधिकारी, अग्निशमन विभाग, महापालिका