महामॅरेथाॅनसाठी सांगवीत वाहतूक बदल; वाहनचालकांनो पर्यायी मार्गांचा वापर करा

By नारायण बडगुजर | Updated: February 21, 2026 17:17 IST2026-02-21T17:17:33+5:302026-02-21T17:17:50+5:30

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून आवाहन

pimpari-chinchwad Traffic changes announced for Mahamarathon; Drivers please use alternative routes | महामॅरेथाॅनसाठी सांगवीत वाहतूक बदल; वाहनचालकांनो पर्यायी मार्गांचा वापर करा

महामॅरेथाॅनसाठी सांगवीत वाहतूक बदल; वाहनचालकांनो पर्यायी मार्गांचा वापर करा

पिंपरी : लोकमततर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन २०२६’ स्पर्धेनिमित्त रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) सांगवी परिसरातील काही मार्गांवर तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत सांगवी फाटा ते राजीव गांधी पुलादरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळता) प्रवेशबंदी राहणार आहे. 
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

‘लोकमत महामॅरेथॉन २०२६’ स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. २२) पहाटे ५ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून करण्यात आले आहे. ३, ५, १० व २१ किलोमीटर अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. मॅरेथॉनचा मार्ग पुणे शहर हद्दीतून राजीव गांधी पूलमार्गे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. पुढे बीआरटी मार्गातून सांगवी फाटा, रक्षक चौक, वाय जंक्शन, जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा-संतोषनगर, डांगे चौक येथील संतोष मंगल कार्यालयाजवळून यू-टर्न घेऊन बीआरटी मार्गे पुन्हा परतीचा प्रवास होणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच स्पर्धकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी, वाहनचालकांनी रविवारी पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केले आहे. त्याचप्रमाणे रक्षक चौक, जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा चौक येथून स्पर्धक मुख्य रस्त्यावरून जाणार आहेत. त्यावेळेत चौकातील वाहतूक तात्पुरती थांबविण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाकड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांनी केले आहे.

सांगवी वाहतूक विभागांतर्गत केलेले वाहतूक बदल

स्पर्धेदरम्यान सांगवी फाटा येथून राजीव गांधी पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने सांगवी फाटा येथील ढोरे पाटील भुयारीमार्गातून डी-मार्ट (महादजी शिंदे रोड) मार्गे इच्छित स्थळी वळविण्यात आली आहे. सांगवी वाहतूक विभागांतर्गत हे बदल केले आहेत.  

चोख पोलिस बंदोबस्त

वाहतूक पोलिसांसोबतच स्थानिक पोलिस ठाण्याकडून देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात सांगवी, वाकड आणि काळेवाडी पोलिस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. यासह पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय प्रशासनाकडून देखील पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.

Web Title : महामॅरेथॉन के लिए सांगवी में यातायात बदला; वैकल्पिक मार्गों का प्रयोग करें।

Web Summary : लोकमत महामॅरेथॉन के कारण 22 फरवरी को सांगवी में यातायात परिवर्तन। सुबह 5 बजे से 10 बजे तक कुछ मार्ग बंद रहेंगे। भीड़ से बचने के लिए वैकल्पिक मार्गों का उपयोग करें।

Web Title : Sangvi traffic rerouted for महामॅरेथॉन; use alternate routes.

Web Summary : Traffic changes in Sangvi for the Lokmat महामॅरेथॉन on February 22nd. Certain routes will be closed from 5 AM to 10 AM. Use alternative routes to avoid congestion.