Pimpari-chinchwad : महापौरही नाही, सभागृहही नाही.. तरी भाजपचा महापालिकेत कारभार..!

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 4, 2026 13:48 IST2026-02-04T13:47:28+5:302026-02-04T13:48:38+5:30

सत्तास्थापनेआधीच पक्षनेत्यांचा हस्तक्षेप : नियमांना पायदळी तुडवून अधिकाऱ्यांचा आढावा

pimpari-chinchwad There is no mayor, no hall yet BJP is in charge of the municipal corporation..! | Pimpari-chinchwad : महापौरही नाही, सभागृहही नाही.. तरी भाजपचा महापालिकेत कारभार..!

Pimpari-chinchwad : महापौरही नाही, सभागृहही नाही.. तरी भाजपचा महापालिकेत कारभार..!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अद्याप सत्तास्थापना झालेली नसताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचा ‘कारभार’ सुरू केल्याचा आरोप होत आहे. शुक्रवारी (दि.६) महापौरांची निवड झाल्यानंतरच सभागृह अस्तित्वात येणार असून, त्यानंतरच महापौर, उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपचे नवनिर्वाचित पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी महापालिकेतील पक्षनेत्यांच्या कार्यालयात बसून कामकाज सुरू केल्याने वाद निर्माण झाला आहे.

महापालिकेत भाजपचे ८४ आणि पुरस्कृत अपक्ष एक असे ८५ नगरसेवक निवडून आले असून, या नगरसेवकांनी विभागीय कार्यालयात गटनोंदणी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत पत्र अद्याप नगरसचिव कार्यालय किंवा आयुक्तांकडे प्राप्त झालेले नाही. त्यामुळे नगरसचिव कार्यालयाकडून कोणत्याही गटनेत्याला कार्यालयांचे अधिकृत वाटप करण्यात आलेले नाही. असे असतानाही शितोळे यांनी तिसऱ्या मजल्यावरील पक्षनेत्यांच्या कार्यालयात बसून सोमवारी (दि.२) भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. मंगळवारी (दि.३) त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावून महापालिकेच्या अंदाजपत्रकासह विविध विषयांचा आढावा घेतल्याची माहिती आहे.

नियमानुसार महापौरांची निवड होऊन त्यांच्या मान्यतेनंतरच सत्तारुढ पक्षनेते व विरोधी पक्षनेते कामकाजास सुरुवात करणे अपेक्षित असते. मात्र, महापौर व उपमहापौरांची निवडच न झाल्याने महापालिकेत अद्याप प्रशासकीय राजवटच कायम आहे. असे असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट हस्तक्षेप केल्याने ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भाजपला नियम पाळायचे नाहीत का,’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नियम काय सांगतो?

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, मोठ्या संख्याबळाच्या पक्षाचा नेता आणि महापौरांकडून ज्याला मान्यता मिळेल, तोच सभागृह नेता मानला जातो. महापौरांची निवड होईपर्यंत सभागृह अस्तित्वात येत नाही. त्यामुळे तोपर्यंत कोणत्याही पक्षनेत्याला अधिकृत अधिकार प्राप्त होत नाहीत.

माझी निवड पक्षाने केली आहे. विभागीय कार्यालयात ८५ नगरसेवकांच्या उपस्थितीत गटनोंदणी झाली आहे. त्यामुळे मी पक्षनेता आहे. गटनोंदणीचे पत्र महापालिकेला मिळाले नसेल, तर तो प्रशासकीय प्रश्न आहे. ती जबाबदारी आमची नाही.  - प्रशांत शितोळे, नवनिर्वाचित पक्षनेते, भाजप

 

Web Title : पिंपरी-चिंचवड: महापौर, सदन नहीं, फिर भी भाजपा का निगम में 'राज'!

Web Summary : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका में महापौर और सदन के बिना भी भाजपा अधिकारियों पर कामकाज चलाने का आरोप है। नवनिर्वाचित दल नेता ने कामकाज की समीक्षा शुरू कर दी, जिससे नियमों के पालन पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Pimpri-Chinchwad: BJP 'Governing' Corporation Without Mayor, House!

Web Summary : Even without a mayor or elected house, BJP officials are accused of running Pimpri-Chinchwad Municipal Corporation. The newly elected party leader has already started reviewing municipal work, raising questions about adherence to regulations.