पालिकेने जाहीर केलेला टीपी रद्द होण्यासाठी शुक्रवारी चोली परिसरामध्ये कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:03 IST2025-05-28T09:02:12+5:302025-05-28T09:03:28+5:30

महापालिकेच्या वतीने चिखली  चन्होलीत सहा नगररचना योजना प्रस्तावित केल्या होत्या.

pimpari-chinchwad Strict closure in Choli area on Friday to cancel TP announced by the municipality | पालिकेने जाहीर केलेला टीपी रद्द होण्यासाठी शुक्रवारी चोली परिसरामध्ये कडकडीत बंद

पालिकेने जाहीर केलेला टीपी रद्द होण्यासाठी शुक्रवारी चोली परिसरामध्ये कडकडीत बंद

पिंपरी : महापालिकेच्या वतीने जाहीर केलेल्या चहोलीतील नगररचना (टीपी) प्रकल्पाविरोधात जनआंदोलन तीव्र होऊ लागले आहे. चहोलीत शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने चिखली  चन्होलीत सहा नगररचना योजना प्रस्तावित केल्या होत्या. नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे चिखलीतील योजना रद्द करण्यात आली. मात्र, चन्होलीतील योजना कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. टीपी रद्द व्हावा, यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत.

आमदार महेश लांडगे, तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाशी संवाद साधला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काही स्थानिकांनी संपर्क साधला होता. त्यानंतर सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित होता. मात्र, अजूनही निर्णय झालेला नाही. यासंदर्भातील श्रेयवाद सोशल मीडियावर रंगला होता. निर्णय न झाल्याने चहोलीकरांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामस्थांची बैठक झाली आणि त्यामध्ये शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या शुक्रवारी चन्होली परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. लवकर निर्णय घ्यावा. - नितीन काळजे, माजी महापौर 

Web Title: pimpari-chinchwad Strict closure in Choli area on Friday to cancel TP announced by the municipality