शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, यंदा तरी लाभ मिळेल का? दत्तक योजनेतील खेळाडूंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 09:40 IST

- महापालिकेकडून ४४ लाभार्थी पात्र, पण दोन महिने उलटूनही मदतीचा निधी नाही; आचारसंहितेमुळे विलंब होण्याची भीती

- आकाश झगडे 

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा विभागाने ऑक्टोबर महिन्यात खेळाडू दत्तक योजनेच्या लाभार्थींची यादी जाहीर केली. मात्र, दोन महिने उलटले तरी, प्रत्यक्षात लाभ मिळालेला नाही. त्यात आचारसंहितेमुळे अजून विलंब होण्याची भीती आहे. त्यामुळे साहेब, यंदा तरी लाभ मिळेल का, असा सवाल दत्तक योजनेतील खेळाडू करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी १३ वर्षांपूर्वी सुरू झालेली खेळाडू दत्तक योजना गेल्या सात वर्षांपासून बंद होती. विशेष म्हणजे योजना बंद असूनही महापालिकेचा क्रीडा विभाग दरवर्षी खेळाडूंकडून अर्ज मागवत होता, मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. खेळाडू दत्तक योजना शहराच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक आहे. परंतु, प्रशासकीय दिरंगाई आणि विलंबामुळे खेळाडूंचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. लाभार्थी खेळाडूंची मागणी

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास निधी वाटपाचे काम थांबते. त्यामुळे लाभ मिळण्यास अजून विलंब होईल. परिणामी खेळाडूंना अत्यावश्यक प्रशिक्षणासाठी किंवा स्पर्धेसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी तातडीने निधी वितरित करावा, अशी मागणी आहे. सात वर्षांनी योजनेला मुहूर्त

योजनेसाठी महापालिकेने २०२४ मध्ये अर्ज मागवले होते. याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या ५८ खेळाडूंनी प्रतिसाद दिला. छाननीनंतर त्यापैकी ४४ खेळाडूंचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. यामुळे तब्बल सात वर्षांनी योजनेला मुहूर्त लागला आहे. या योजनेतून निवड झालेल्या खेळाडूंना सराव, आवश्यक साहित्य आणि प्रशिक्षणासाठी महापालिकेकडून आर्थिक मदत मिळणार आहे.

२०२३-२४ चा लाभ कधी मिळणार?२०२२-२३ च्या लाभाची अशी अवस्था असतानाच महापालिकेने २०२३-२४ या वर्षासाठीही अर्ज मागविले आहेत. यासाठी ३८ जणांनी प्रतिसाद देत अर्ज दाखल केले आहेत. या वर्षाच्या अर्जांची कधी छाननी होणार आणि त्यांच्या खात्यावर लाभ कधी येणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

काय आहे खेळाडू दत्तक योजना?

ही योजना महापालिका हद्दीतील किमान तीन वर्षे रहिवासी असलेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी आहे. याअंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना पीएमपीएमएल बसमधून मोफत प्रवास, सकस आहारासाठी भत्ता, खेळाचे साहित्य आणि गणवेश, फिजिओथेरपी आणि क्रीडा वैद्यकीय सुविधा, स्पर्धेत प्रावीण्य मिळाल्यास स्वतंत्र शिष्यवृत्ती मिळते.

 ऑक्टोबरमध्ये यादी जाहीर झाली. अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. आचारसंहिता लागल्यास निधी पुन्हा अडकेल आणि पुढील वर्षाच्या स्पर्धेची तयारी थांबेल. महापालिकेने फक्त कागदपत्रे पूर्ण केली, पण प्रत्यक्षात आम्हाला मदत कधी मिळणार? - पात्र खेळाडू

डिसेंबर महिन्यात सर्व पात्र लाभार्थींना निधी देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेत. खेळाडूंना निधी वाटपात आचारसंहितेमुळे विलंब होणार नाही.- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग.

English
हिंदी सारांश
Web Title : Adopted players question delayed benefits; fear election code impact.

Web Summary : Pimpri-Chinchwad's adopted player scheme faces delays. Players await promised funds for training and equipment. Election code threatens further hold-ups, jeopardizing preparations. Officials aim for December disbursement.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड