शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंड्यांची वाट बिकट; वारकऱ्यांची सुरक्षा रामभरोसे; जीव मुठीत धरून चालवं लागतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:59 IST

- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटातून आळंदीला जाणाऱ्या कार्तिक एकादशीच्या वारीतील पायी दिंडीत भरधाव कंटेनर वाहन शिरल्याने एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला

चाकण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी वारीसाठी पुणे, नाशिक आणि जुना पुणे-मुंबई महामार्गाने आळंदीकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सतत वाहतूक करणाऱ्या या महामार्गावर वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वारकऱ्यांना जीव धोक्यात घालून जपून चालावे लागत असल्याचे दिसत आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीकडे पायी वारी सुरू आहे. मात्र, ११ कार्तिक, मंगळवारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटातून आळंदीला जाणाऱ्या कार्तिक एकादशीच्या वारीतील पायी दिंडीत भरधाव कंटेनर वाहन शिरल्याने एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जाहीर झाला आहे. श्रीक्षेत्र आळंदीकडे पायी पालखी दिंडीमध्ये सर्वांत पुढे पताकाधारी असतो, त्याच्या मागे टाळकरी आणि विणेकरी, त्यापुढे तुळशी वृंदावन सोडलेल्या महिला आणि भाविकांचा समावेश असतो. पताकाधारी चालत असल्याने दिंडीही त्या क्रमाने चालू असते.

महामार्गावरील सततची प्रचंड वाहतूक कोंडी आणि विरुद्ध दिशेने येणारी सुसाट वाहने यामुळे वारकऱ्यांना पायी चालायला देखील रस्ता शिल्लक राहत नाही. त्यामुळे दिंड्यांतील वारकऱ्यांवर अपघाताचा धोका कायम आहे. आळंदी कार्तिकी यात्रेच्या बैठकीत दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचा विषय कधीही प्राधान्याने चर्चेत येत नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याने कार्तिकी दिंडीची वाट बिकट आणि अपघाती ठरत आहे. पंढरपूर पालखी मार्गावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार इतर महत्त्वाच्या दिंडी मार्गांवर साधी रस्ते सुरक्षितता आणि तात्पुरत्या सुविधा पुरवत नाही, याबाबत वारकरी खंत व्यक्त करत आहेत.

दिंडीमधील वारकऱ्यांची स्वयंसेवकांद्वारे काळजी घेतली जाते; मात्र बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका संभवतो. धर्माचे रक्षण करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या रक्षणाची जबाबदारी अथवा दखल सरकारकडून घेतली जात नाही, याची खंत वाटते. दिंडी मार्गावरील स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे हभप मुक्ताजीदादा नाणेकर, चाकण यांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pilgrims' perilous path to Alandi; safety at risk.

Web Summary : Pilgrims walking to Alandi face dangers due to heavy traffic and lack of safety measures. A recent accident highlighted the risks, with concerns raised about government support for pilgrim routes. Police vigilance is crucial for devotee safety.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे