शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत कोट्यवधींचे प्रस्ताव, पण स्पष्टता नाही; सर्वसाधारण सभेत मात्र मंजुरीचा सपाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:25 IST

- टीडीआर, जकात नाक्यांच्या जागांचा वापर, पर्यावरण अभियांत्रिकी कामे 

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर विकासाशी संबंधित कोट्यवधीच्या प्रस्तावांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. मात्र, या प्रस्तावांच्या खर्चाबाबत आणि त्यातून शहराला होणाऱ्या प्रत्यक्ष फायद्याबाबत ठोस माहिती नसल्याने पुन्हा एकदा मंजुरीचा सपाटा लावला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) संबंधित प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. शहरातील काही भूखंड आणि विकास आराखड्यातील आरक्षणांबाबत टीडीआर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयांमुळे जमीनमालकांना मोठ्या प्रमाणावर विकास हक्क मिळणार असून, त्याचा आर्थिक परिणाम कोट्यवधी रुपयांमध्ये होणार आहे. मात्र, या व्यवहारांमुळे महापालिकेला नेमका किती फायदा होणार, याबाबत स्पष्टता नाही.

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाशी संबंधित काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचाही विषय अजेंड्यावर आहे. शहरातील पायाभूत सुविधा, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि नागरी सेवा सुधारण्यासाठी ही कामे प्रस्तावित असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यासाठी होणारा खर्च मोठा आहे. कोट्यवधींच्या प्रस्तावांवर पुरेशी चर्चा न होता केवळ औपचारिक मंजुरी दिली जाणार का, असा सवाल आहे.

काही समित्यांवरील प्रतिनिधींची नियुक्ती, आधी घेतलेल्या निर्णयांना मंजुरी आणि प्रशासकीय बाबींचे विषयही सभेत ठेवण्यात आले आहेत. मात्र, शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि आर्थिक शिस्त या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रस्तावांना मंजुरी देण्याची परंपरा कायम राहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जागांचा नेमका वापर कशासाठी?

शहरातील जुन्या जकात नाक्यांच्या जागांचा वापर बदलण्यासंबंधीही प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आले आहेत. सुमारे १०० चौरस मीटर परिसरातील या जागा विविध प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या जागांचा नेमका वापर कशासाठी आणि त्यातून शहराला काय लाभ होणार, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad: Crores of Proposals Approved Without Clarity in General Meeting.

Web Summary : Pimpri-Chinchwad faces scrutiny as crores worth proposals lack clarity. TDR decisions and infrastructure projects raise questions about benefits and financial implications. Concerns arise over hasty approvals.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड