विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन;विकास आराखडा, नदी प्रदूषण, वाहतूककोंडीवर आमदारांनी उठविला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:40 IST2025-07-25T14:40:18+5:302025-07-25T14:40:53+5:30

- पिंपरी-चिंचवड शहरातील पाच आमदारांनी मांडले प्रश्न; स्थानिक आणि राज्यस्तरीय विषयांवरील चर्चेमध्ये सहभाग

pimpari-chinchwad news Monsoon session of the legislature; MLAs raise voice on development plan, river pollution, traffic congestion | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन;विकास आराखडा, नदी प्रदूषण, वाहतूककोंडीवर आमदारांनी उठविला आवाज

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन;विकास आराखडा, नदी प्रदूषण, वाहतूककोंडीवर आमदारांनी उठविला आवाज

पिंपरी : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचे दोन अशा पाच आमदारांनी स्थानिक आणि राज्यस्तरीय विषयांवर प्रश्न मांडले आणि चर्चेमध्ये सहभाग नोंदविला. विकास आराखडा, नदी प्रदूषण, वाहतूककोंडी, चुकीची विकासकामे आदी विषयांवर या आमदारांनी आवाज उठविला.

पिंपरी मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे, चिंचवडमधील भाजपचे आमदार शंकर जगताप, भाजपचे विधान परिषदेचे आमदार आणि तालिका सभापती अमित गोरखे व उमा खापरे यांनी अधिवेशनात प्रश्न मांडले.

पिंपरी-चिंचवडचा विकास आराखडा रद्द करावा, पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी परिणामकारक उपायोजना कराव्यात, प्राधिकरणाच्या हद्दीतील मिळकती फ्री होल्ड कराव्यात, मुळा नदीतील बेकायदेशीर वाळू उपसा, हिंजवडीतील वाहतूककोंडी आणि विविध प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनातील गैरप्रकार या विषयांवर आमदारांनी आवाज उठविला. त्याचा परिपाक म्हणजे हिंजवडीतील वाहतूककोंडी आणि विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन महापालिका, जिल्हा प्रशासनास सूचना केल्या.

अधिवेशनातील १० प्रश्नांवर चर्चेत सहभाग घेतला. महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा, हिंजवडी आयटी पार्क समस्या, चाकण औद्योगिक पट्ट्यातील समस्या, प्राधिकरणाच्या हद्दीतील मिळकती ‘फ्री होल्ड’ करणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या, पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करणे, जीएसटी फसवणूक रॅकेट, चिखली घरकूलवासीयांची घरपट्टी माफ करणे, नदी सुधार प्रकल्प, पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न यासह दारूबंदी विधेयकावर भूमिका मांडली. - महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसराच्या विविध मुद्यांवर विशेषत: वाहतूककोंडी, पर्यावरण संवर्धन, नदी सुधार प्रकल्प आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा यासाठी सातत्याने काम करीत आहोत. अधिवेशनात संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली आहेत. त्यासाठी आगामी काळात पाठपुरावा करणार आहोत. - महेश लांडगे, आमदार, भोसरी

पिंपरी-चिंचवड परिसरातील गंभीर प्रश्नांशी निगडित ११ तारांकित प्रश्न आणि १० लक्षवेधी सूचना प्रामुख्याने होत्या. डीपीतील बेकायदेशीर रस्त्यांची आरक्षणे रद्द करणे, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या, मालेगावमध्ये पाचशेच्या बनावट नोटांशी संबंधित गुन्हेगारी कारवाई, पवना, मुळा, इंद्रायणी नदी स्वच्छता व प्रदूषणमुक्ती, मुळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई, अन्नधान्य वितरण कार्यालयातील गैरकारभार, शिक्षण विभागातील अपात्र शिक्षकांच्या वेतन घोटाळा असे विषय मांडले. अधिवेशनात लक्षवेधी, चर्चा अशासकीय विधेयक याबाबतच्या चर्चांत सहभाग नोंदवला. स्थानिक मुद्द्यांबरोबरच शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना, नार्कोटिक्स सेल यावर मत मांडले. कामगार, शिक्षक, रुग्ण, वाहतूकपीडित, झोपडीधारक, शेतकरी, महिला, विद्यार्थी अशा सर्व घटकांचे प्रश्न मांडले. - शंकर जगताप, आमदार, चिंचवड
 
  पिंपरी-चिंचवड शहरातील इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पात्रात भराव टाकणे, दौंड येथील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेमध्ये दाखल झालेल्या अनाथ मुलींवरील, तसेच इतर संस्थांमध्ये ख्रिचन धर्म स्वीकारण्यासाठी मुलींवरील अत्याचार, भिवंडीमधील गोदामांना आग लागण्याच्या दुर्घटना यासह चंद्रपूर, बीड, मुंबई, भिवंडी, पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील प्रश्न मांडले.
 
पिंपरी-चिंचवड शहराचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करावे, अण्णासाहेब मगर स्टेडियमला निधी उपलब्ध करून द्यावा, मिलिंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील घोटाळा, पिंपरी-चिंचवडचा विकास आराखडा रद्द करावा. बोपखेलमध्ये खासगी जागेवर शाळेचे आरक्षण हे विषय मांडले. - उमा खापरे, आमदार, विधान परिषद
 
 पिंपरी-चिंचवडचा विकास आराखडा रद्द करा, धर्मांतर करून अनुसूचित जाती आरक्षणाचे लाभ घेणाऱ्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे, पीएमपीमध्ये प्राथमिक सुरक्षा साधनांची कमतरता, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ द्यावा, अण्णा भाऊ साठे महामंडळसाठी निधी द्यावा, तांत्रिक ऑडिट आणि दोषींवर कारवाई करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस ठाणे आरक्षण रद्द करा, असे विषय मांडले. - अमित गोरखे  

यंदाच्या तालिका सभापतीपदी संधी मिळाली. त्यात २३ लक्षवेधी आणि इतर विषय मांडले. राज्यातील व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांवर लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न आणि औचित्याचे मुद्दे उपस्थित केले. राज्य शासनाच्या मंत्र्यांनी त्यास उत्तरे दिली. त्याचा पाठपुरावा करणार आहे.- अमित गोरखे, आमदार, विधान परिषद
 
अधिवेशनातील १० प्रश्नांवर चर्चेत सहभाग घेतला. महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा, हिंजवडी आयटी पार्क समस्या, चाकण औद्योगिक पट्ट्यातील समस्या, प्राधिकरणाच्या हद्दीतील मिळकती ‘फ्री होल्ड’ करणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या, पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करणे, जीएसटी फसवणूक रॅकेट, चिखली घरकूलवासीयांची घरपट्टी माफ करणे, नदी सुधार प्रकल्प, पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न यासह दारूबंदी विधेयकावर भूमिका मांडली.
 
पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसराच्या विविध मुद्यांवर विशेषत: वाहतूककोंडी, पर्यावरण संवर्धन, नदी सुधार प्रकल्प आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा यासाठी सातत्याने काम करीत आहोत. अधिवेशनात संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली आहेत. त्यासाठी आगामी काळात पाठपुरावा करणार आहोत. - महेश लांडगे, आमदार, भोसरी

 पिंपरी-चिंचवड परिसरातील गंभीर प्रश्नांशी निगडित ११ तारांकित प्रश्न आणि १० लक्षवेधी सूचना प्रामुख्याने होत्या. डीपीतील बेकायदेशीर रस्त्यांची आरक्षणे रद्द करणे, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या, मालेगावमध्ये पाचशेच्या बनावट नोटांशी संबंधित गुन्हेगारी कारवाई, पवना, मुळा, इंद्रायणी नदी स्वच्छता व प्रदूषणमुक्ती, मुळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई, अन्नधान्य वितरण कार्यालयातील गैरकारभार, शिक्षण विभागातील अपात्र शिक्षकांच्या वेतन घोटाळा असे विषय मांडले. अधिवेशनात लक्षवेधी, चर्चा अशासकीय विधेयक याबाबतच्या चर्चांत सहभाग नोंदवला. स्थानिक मुद्द्यांबरोबरच शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना, नार्कोटिक्स सेल यावर मत मांडले. कामगार, शिक्षक, रुग्ण, वाहतूकपीडित, झोपडीधारक, शेतकरी, महिला, विद्यार्थी अशा सर्व घटकांचे प्रश्न मांडले. - शंकर जगताप, आमदार, चिंचवड
 
पिंपरी-चिंचवड शहरातील इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पात्रात भराव टाकणे, दौंड येथील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेमध्ये दाखल झालेल्या अनाथ मुलींवरील, तसेच इतर संस्थांमध्ये ख्रिचन धर्म स्वीकारण्यासाठी मुलींवरील अत्याचार, भिवंडीमधील गोदामांना आग लागण्याच्या दुर्घटना यासह चंद्रपूर, बीड, मुंबई, भिवंडी, पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील प्रश्न मांडले.  पिंपरी-चिंचवड शहराचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करावे, अण्णासाहेब मगर स्टेडियमला निधी उपलब्ध करून द्यावा, मिलिंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील घोटाळा, पिंपरी-चिंचवडचा विकास आराखडा रद्द करावा. बोपखेलमध्ये खासगी जागेवर शाळेचे आरक्षण हे विषय मांडले.
- उमा खापरे, आमदार, विधान परिषद
 
 पिंपरी-चिंचवडचा विकास आराखडा रद्द करा, धर्मांतर करून अनुसूचित जाती आरक्षणाचे लाभ घेणाऱ्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे, पीएमपीमध्ये प्राथमिक सुरक्षा साधनांची कमतरता, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ द्यावा, अण्णा भाऊ साठे महामंडळसाठी निधी द्यावा, तांत्रिक ऑडिट आणि दोषींवर कारवाई करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस ठाणे आरक्षण रद्द करा, असे विषय मांडले. यंदाच्या तालिका सभापतीपदी संधी मिळाली. त्यात २३ लक्षवेधी आणि इतर विषय मांडले. राज्यातील व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांवर लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न आणि औचित्याचे मुद्दे उपस्थित केले. राज्य शासनाच्या मंत्र्यांनी त्यास उत्तरे दिली. त्याचा पाठपुरावा करणार आहे. -अमित गोरखे, आमदार, विधान परिषद

Web Title: pimpari-chinchwad news Monsoon session of the legislature; MLAs raise voice on development plan, river pollution, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.