टाकवे बुद्रूक : येथील एका खासगी शाळेच्या पटांगणात मंगळवारी सकाळी अघोरी कृत्य केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली. शाळेतील प्रवेशद्वाराजवळ लिंबू, अंडी, कुंकू आणि चुन्याच्या पुड्या टाकून गोलाकार चिन्ह काढल्याचे आढळून आले. अचानक आढळलेल्या या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली असून कोणी आणि कोणत्या उद्देशाने हे कृत्य केले याबाचत अद्याप स्पष्टता नाही, मात्र अशा अघोरी कृतीमुळे शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. या प्रकरणी प्रशासनाने तपास करून संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/731577779439435/}}}}
स्थानिक नागरिकांत चिंतेचे वातावरण
या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे. पोलीसही या प्रकरणाची माहिती तपासत असून सत्य परिस्थिती स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Web Summary : Takwe Budruk school found with ritual objects, sparking fear. Police investigate the incident, raising safety concerns. Locals demand action.
Web Summary : तकवे बुद्रुक स्कूल में तांत्रिक वस्तुएं मिलने से दहशत। पुलिस मामले की जांच कर रही है, सुरक्षा चिंताएं बढ़ीं। स्थानीय लोगों ने कार्रवाई की मांग की।