शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवर आमदार, खासदार, सरकारी कामावर, पोलिस पाट्या लावण्याचा सोस;दंडात्मक कारवाईकडे कानाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:46 IST

- वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : दंडात्मक कारवाईकडे कानाडोळा

- सचिन ठाकर पवनानगर : मावळ तालुक्यात चारचाकी वाहनांवर विविध पदांच्या पाट्या व स्टिकर लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तालुक्यातील अनेक वाहनांवर आमदार, खासदार, सरकारी कामावर, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते, संघटना पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य अशा आशयाच्या पाट्या आढळून येत आहेत. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून दंडात्मक करवाईकडे कानाडोळा केला जात आहे.

मावळ तालुक्यात ग्रामीण भागात जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे चारचाकी आलिशान वाहन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर पाट्या लावण्याची क्रेझ वाढली आहे. पाट्यांमुळे संबंधित वाहनांना विशेष महत्त्व असल्याचा आभास तयार होतो. काहीजण स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांमधून टीका होत आहे.

नियमांची पायमल्ली

वाहतुकीच्या नियमांनुसार अनधिकृत पदनाम, सरकारी ओळख दर्शवणाऱ्या पाट्या लावणे चुकीचे आहे. तरीही अनेक खासगी वाहनांवर अशा पाट्या दिसून येत आहेत, ज्यामुळे नियमांची पायमल्ली होत आहे. काही वाहनांवर मोठ्या अक्षरांत वेगवेगळी स्टिकर लावली जातात; तर काही वाहनांवर आमदार, खासदार आणि सरकारी कामावर, पोलिस मित्र, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते अशा प्रकारच्या पाट्याही आहेत. यामुळे कोण अधिकृत आहे आणि कोण नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. 

कारवाई टाळण्यासाठी शक्कल

वाहतूक तपासणी टाळण्यासाठी अथवा प्रभाव टाकण्यासाठी अशा पाट्यांचा वापर केला जातो, अशी चर्चा आहे. त्यामुळे वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासनाने यावेळी विशेष मोहीम राबवून अनधिकृत पाट्यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

कारवाई होणार कधी?

मावळ तालुक्यात वाढत असलेल्या या प्रकारावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात वाहनांवर पदनामाच्या पाट्यांचा वापर आणखी वाढेल. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी मावळ परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maval: Unauthorized plates on vehicles; police turn a blind eye.

Web Summary : Maval witnesses rise in unauthorized plates on vehicles displaying positions like MLA, MP, and 'On Government Duty'. Citizens criticize the use of these plates for influence, demanding police action against violators and stricter enforcement of traffic rules to prevent misuse.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस