शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
5
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
6
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
7
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
8
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
9
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
10
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
11
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
12
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
13
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
14
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
15
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
17
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
19
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
20
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : डॉक्टरांच्या वेळकाढूपणामुळे नवजात शिशूचा'तालेरा'त मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:40 IST

- कळा असह्य झाल्याने प्रसूती कक्षात नेऊन तिची प्रसूती केली असता, नवजात शिशूचा मृत्यू झाला. म

पिंपरी : रात्रीपासून महिलेला प्रसूती वेदना होत असताना वेळकाढूपणा करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तिला डाव्या कुशीवर झोपण्यास सांगितले. मात्र, कळा असह्य झाल्याने प्रसूती कक्षात नेऊन तिची प्रसूती केली असता, नवजात शिशूचा मृत्यू झाला. महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात बुधवारी (दि.३)पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. याची वैद्यकीय विभागाकडून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय महिलेच्या प्रथम गर्भावस्थेतील तपासण्या सर्व तालेरा रुग्णालयात सुरू होत्या. त्यात बाळ व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. नऊ महिने पूर्ण झाल्याने ती प्रसूतीसाठी दाखल झाली. मंगळवारी सायंकाळी सहापासून प्रसूतीच्या वेदना जाणवत होत्या. मात्र,डॉक्टरांनी तिला सतत डाव्या कुशीवर झोपण्यास सांगत वेळकाढूपणा केला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वेदना असह्य झाल्याने नातेवाईक आत गेले असता, देखरेख ठेवणारे डॉक्टर झोपलेले आढळून आले. त्यानंतर तिला प्रसूती कक्षात नेऊन नैसर्गिक प्रसूती केली.

विष्ठा श्वासनलिकेत गेल्याने मृत्यूबाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बाळ बाहेर येण्यासाठी धडपडत असताना त्याने पोटातच विष्ठा केली. ती विष्ठा त्याच्या श्वासनलिकेत गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी रुग्णालय प्रमुख डॉ. संजय सोनेकर यांनी केली आहे. या प्रकरणाची आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी चौकशी सुरू केली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे....तर बाळ वाचले असतेमहिलेला प्रसूती वेदना होत असताना तिची तातडीने सोनोग्राफी केली असती, तर बाळ बाहेर येण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले असते. त्यावेळी प्रसूती केली असती, तर बाळ सुखरूप बाहेर आले असते. याप्रसंगी स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे.

बाळ व्यवस्थित असल्याने प्रसूतीआधी सोनोग्राफी केली नाही. मात्र, बाळ बाहेर येण्याची धडपड करत असताना, त्याने पोटातच विष्ठा केली. ती त्याच्या श्वासनलिकेत गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. देखरेखीसाठी नेमलेले प्रशिक्षणार्थी डॉक्टर झोपलेले नातेवाइकांना आढळून आले. त्या डॉक्टरांचा कामाचा पहिलाच दिवस होता. - डॉ. संजय सोनेकर,प्रमुख,तालेरा रुग्णालय

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad: Negligence Allegedly Leads to Newborn's Death at Talera Hospital

Web Summary : A newborn died at Talera Hospital due to alleged negligence by trainee doctors who delayed a woman's labor. The baby reportedly ingested meconium, leading to respiratory failure. An investigation is underway to determine the cause of death and assess potential negligence.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यpregnant womanगर्भवती महिला