- प्रशांत होनमाने
पिंपरी : आकाशाकडे शांतपणे पाहत केलेले निरीक्षणही मोठे ज्ञान देऊ शकते, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील नीलेश बोराटे यांच्या अभ्यासातून आला आहे. तब्बल ३५ वर्षे दररोज चंद्राचे डोळ्यांनी निरीक्षण करत त्यांनी चंद्रावर आधारित संशोधनात्मक पुस्तक तयार केले आहे. या अभ्यासाची दखल अलीकडेच ठाणे येथे झालेल्या खगोल संमेलनात घेण्यात आली.
नीलेश बोराटे यांना चंद्र निरीक्षणाची आवड लहानपणी १९९० च्या दरम्यान लागली. तेव्हा ते तिसरीत होते. दररोज रात्री आकाशातील चंद्र पाहून त्यातील बदल, आकार, दिशा आणि हालचाली यांची नोंद त्यांनी शांतपणे करायला सुरुवात केली. चंद्राच्या कलांचा अभ्यास, चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ, चंद्र-ग्रह युती, हवामानातील बदलांची चाहूल, चंद्र पृथ्वीच्या जवळ किंवा दूर असल्याची कल्पना याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. साध्या पार्श्वभूमीतून आलेला अभ्यासक बोराटे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण चिखलीच्या नागेश्वर विद्यालयात झाले. शिवाजी विद्यालय, देहूरोड येथून बारावी पूर्ण केली. आकुर्डीतील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयातून बी. कॉम. आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एमबीए (फायनान्स) शिक्षण घेतले.
ठाणे येथे झालेल्या खगोल संमेलनात विशेष दखल
कळवा (ठाणे) येथे ३१ जानेवारी रोजी झालेल्या १४ व्या खगोल संमेलनात बोराटे यांनी आपल्या पुस्तकाची प्रत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांना दिली. दुसऱ्या दिवशी संमेलन सुरू असताना सोमण यांनी व्यासपीठावरून अचानक बोराटे यांचे नाव घेत त्यांच्या अभ्यासाचे कौतुक केले.
'आयुका'च्या शास्त्रज्ञांकडून बोराटे यांना प्रोत्साहन
'आयुका' येथे शास्त्रज्ञ प्रा. सुहृद मोरे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी बोराटे यांना चंद्रावरील निरीक्षणांचे इंग्रजी भाषांतर केल्यास ते संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित होऊ शकते, यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
चंद्र निरीक्षणातून मिळणारे ज्ञान आणि सणाची माहिती
त्यांनी तयार केलेल्या पुस्तकात चंद्राच्या २७ कलांचा अभ्यास मांडला आहे. या अभ्यासातून भारतीय पंचांग समजणे, भारतीय सणांची माहिती मिळणे, ग्रहांची हालचाल समजणे शक्य होते, असे ते सांगतात.
Web Summary : Nilesh Borate's 35 years of lunar observations culminated in a research book. His work, acknowledged at a recent astronomy conference, details lunar phases and their connection to Indian festivals. Scientists encourage publishing his findings in journals.
Web Summary : नीलेश बोराटे के 35 वर्षों के चंद्र अवलोकनों का परिणाम एक शोध पुस्तक है। उनके काम को हाल ही में एक खगोल विज्ञान सम्मेलन में स्वीकार किया गया, जिसमें चंद्र चरणों और भारतीय त्योहारों के साथ उनके संबंध का विवरण है। वैज्ञानिक पत्रिकाओं में उनके निष्कर्षों को प्रकाशित करने के लिए प्रोत्साहित करते हैं।