तीन वर्षांत ६२८ पिस्तुलांसह तीन हजार शस्त्रे जप्त;३७४४ संशयितांना केली अटक

By नारायण बडगुजर | Updated: December 26, 2025 12:23 IST2025-12-26T12:22:38+5:302025-12-26T12:23:14+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अडीच हजार गुन्हे दाखल करून ३७४४ संशयितांना केली अटक

pimpari-chinchwad crime three thousand weapons, including 628 pistols, seized in three years | तीन वर्षांत ६२८ पिस्तुलांसह तीन हजार शस्त्रे जप्त;३७४४ संशयितांना केली अटक

तीन वर्षांत ६२८ पिस्तुलांसह तीन हजार शस्त्रे जप्त;३७४४ संशयितांना केली अटक

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात जोरदार मोहीम उघडत शहरातील कोयता गँग व बेकाशदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या तीन वर्षांत पोलिसांनी ६२८ बेकायदेशीर पिस्तूल आणि २,५२१ कोयता, पालघनसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन वर्षांत २,५६७ गुन्हे दाखल करून ३,७४४ संशयितांना अटक केली.

निवडणूक काळात दहशत निर्माण करण्याचे कट उधळून लावत पोलिसांनी शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवली. स्थानिक पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून या मोहिमेत पिस्तूल, काडतूस, काेयते, पालघन यांसारखे घातक शस्त्र जप्त करून कारवाई करण्यात आली.

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नाकाबंदी, नियमित तपासणी करण्यात येत आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास हयगय केली जाणार नाही. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.  - विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड   

बेकायदेशीर पिस्तूलप्रकरणी केलेली कारवाई

वर्ष - दाखल गुन्हे - जप्त पिस्तूल - अटक

२०१८ - ४५ - ५२ - ७४

२०१९ - ५९ - ५९ - ११९

२०२० - ६६ - ११८ - ९९

२०२१ - ७१ - ८२ - १२७

२०२२ - ४४ - ५६ - ७५

२०२३ - १३१ - १७४ - २५७

२०२४ - १६९ - २१६ - २४२

२०२५ (२४ डिसेंबर) - २०१ - २३८ - २४६

-----------------------------

धारदार शस्त्रप्रकरणी केलेली कारवाई

वर्ष - दाखल गुन्हे - जप्त शस्त्र - अटक

२०१८ - २३ - ३४ - ३२

२०१९ - ५६ - ७० - ९८

२०२० - ३९ - ४४ - ५६

२०२१ - ७५ - ७९ - ७९

२०२२ - १३२ - २५६ - १५२

२०२३ - ५८६ - ७०३ - ८६८

२०२४ - ७४२ - ९३० - १०९१

२०२५ (२४ डिसेंबर) - ७३८ - ८८८ - १०४०

Web Title : पिंपरी-चिंचवड पुलिस ने हथियार जब्त किए, तीन साल में हजारों गिरफ्तार

Web Summary : पिंपरी-चिंचवड पुलिस ने अवैध हथियारों पर कार्रवाई करते हुए तीन साल में 628 पिस्तौल और हजारों हथियार जब्त किए। चुनाव संबंधी हिंसा को रोकने और कानून व्यवस्था बनाए रखने के लिए विशेष अभियान चलाकर 3744 से अधिक संदिग्धों को गिरफ्तार किया गया।

Web Title : Pimpri-Chinchwad Police Seize Weapons, Arrest Thousands in Three Years

Web Summary : Pimpri-Chinchwad police cracked down on illegal weapons, seizing 628 pistols and thousands of other weapons in three years. Over 3744 suspects were arrested for illegal possession, preventing election-related violence and maintaining law and order through special operations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.