पिंपरी : शहरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून २९ लाख ४४ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. तपासात १२ गुन्हे उघड झाले आहेत. सोमाटणे टोलनाक्यावर एक महिन्यापूर्वी पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात चकमक होऊन पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने सनीसिंग पापासिंग दुधानी (वय २४, रा. हडपसर), जलसिंग रजपूतसिंग दुधानी (३२, रा. हडपसर), मनीष बाबूलाल कुशवाह (२८ रा. कैलास, मूळ रा. मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. हिंजवडी पोलिस हद्दीत २३ नोव्हेंबरला रात्री घरफोडी करून सेलेरिओ (एमएच- १४, जेई- २६२८) या गाडीची चोरी केल्याची नोंद रावेत पोलिस ठाण्यात झाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या प्रकरणाची दखल घेत तपासाचे आदेश दिले. त्यावेळी २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. त्यावेळी ही टोळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने लोणावळ्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर २७ नोव्हेंबरच्या रात्री वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी आपल्या टीमसह सोमाटणे टोलनाक्यावर सापळा रचला. पहाटे ५:३० च्या सुमारास संशयित गाडी लेन नंबर ३ मध्ये येताच पोलिसांनी ती अडवली. त्यावेळी गाडीत मागे बसलेल्या एकाने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, ही गोळी गाडीच्या दरवाजाला लागली. याचवेळी अंमलदार राठोड यांची आरोपीशी झटापट झाली. संशयितांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले. अटक केली.
त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यानुसार ताब्यातून २९ लाख ४४ हजार ७०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे, चोरीसाठी वापरलेली सेलेरिओ कार, हत्यारे जप्त केली आहेत.
७१ गुन्हे दाखल, ‘मोका’मधून बाहेर
सनीसिंग दुधानीवर तब्बल ७१ गुन्हे दाखल असून तो ‘मोका’मधून नुकताच बाहेर आला होता. जलसिंग दुधानीवर ५६, तर मनीष कुशवाहवर ७१ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून दागिने विकत घेणारे किरपानसिंग शीतलसिंग दुधानी (३७, रा. भैरवनाथनगर, कुसगाव), शांताराम ऊर्फ संतोष कांबळे (३०, रा. भैरवनाथनगर, कुसगाव) आणि अक्षय राजू चनाल (३०, रा. शिवाजी पेठ, खंडाळा) या सहकाऱ्यांनाही अटक केली आहे. दुधानीवर २३ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
Web Summary : Police arrested a gang that shot at them, recovering stolen jewelry worth ₹29.44 lakhs and revealing 12 burglaries. The gang members, with extensive criminal records, were apprehended after a shootout at Somatane toll plaza. Accomplices involved in buying the stolen goods were also arrested.
Web Summary : पुलिस ने गोली चलाने वाले गिरोह को गिरफ्तार किया, ₹29.44 लाख के चोरी के गहने बरामद किए और 12 चोरियां उजागर कीं। गिरोह के सदस्य, जिनके आपराधिक रिकॉर्ड हैं, सोमाटने टोल प्लाजा पर मुठभेड़ के बाद पकड़े गए। चोरी का सामान खरीदने में शामिल साथियों को भी गिरफ्तार किया गया।