पिंपरी : शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल ॲपवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २३ डिसेंबर २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मातृछाया निवास, दळवीनगर, चिंचवड येथे ऑनलाइन माध्यमातून घडली.पीडित महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयेश पाटील ऊर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (लोअर परेल, मुंबई व कवड हाशिवरे, कुरुळ, अलिबाग, रायगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने फिर्यादीचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. त्याने फिर्यादीला आयसीआयसीआय बँकेतून प्री-अप्रूव्हड लोन, ओव्हर ड्राफ्ट सॅलरी लोन आणि एका ॲपमधून ऑनलाइन कर्ज घेण्यास भाग पाडले. या कर्जाचे हप्ते भरण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊनही त्याने पैसे न भरता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.
Web Summary : A Pimpri woman lost ₹3.1 million after being lured with marriage on a matrimonial app. The accused, Jayesh Patil, gained her trust and coaxed her into taking loans, then defaulted on repayments, leading to significant financial fraud. Police are investigating.
Web Summary : पिंपरी की एक महिला को मैट्रिमोनियल ऐप पर शादी का झांसा देकर ₹31 लाख का नुकसान हुआ। आरोपी जयेश पाटिल ने उसका विश्वास जीता और उसे ऋण लेने के लिए राजी किया, फिर पुनर्भुगतान में चूक गया, जिससे महत्वपूर्ण वित्तीय धोखाधड़ी हुई। पुलिस जांच कर रही है।