शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:32 IST

आरोपीने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत पुजाऱ्याची वेशभूषा परिधान केली आणि मंदिरात प्रवेश केला.

पिंपरी- चिंचवड परिसरात असलेल्या भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर येथे पुजाऱ्याच्या वेशात येऊन चांदीचा मुकुट चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.मिळलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ ने अटक केलेल्या आरोपीचे नाव नरेश अगरचंद जैन असे आहे. आरोपीने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत पुजाऱ्याची वेशभूषा परिधान केली आणि मंदिरात प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की, मंदिरात प्रवेश करताच त्याने प्रथम देवासमोर हात जोडून दर्शन घेतले. त्यानंतर योग्य संधी साधत सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा व एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट कपड्याने झाकून लंपास केला.

  चोरी केल्यानंतर आरोपी अत्यंत शिताफीने मंदिरातून बाहेर पडला. मात्र, ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट १ ने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश जैन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. चोरीस गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chinchwad: Silver Crown Vanishes After Prayer; Thief Arrested Quickly

Web Summary : A seasoned thief, disguised as a priest, stole a silver crown worth ₹2.5 lakh from a Jain temple in Chinchwad. Police swiftly arrested the culprit, Naresh Jain, within 48 hours. Jain, with 12 prior offenses, was caught using CCTV footage. The stolen crown was recovered, and security is being increased.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या