शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Video : पिंपरीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा; डांगे चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:53 IST

रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी उभी करून चालकाने सुमारे अर्धा तास धिंगाणा घातल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा डांगे चौक परिसर काल रात्री एका मद्यधुंद रिक्षाचालकाच्या गोंधळामुळे अक्षरशः ठप्प झाला. रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी उभी करून चालकाने सुमारे अर्धा तास धिंगाणा घातल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.मिळालेल्या माहितीनुसार, डांगे चौकातील एका हॉटेल समोर ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. संबंधित रिक्षाचालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने आपली रिक्षा भररस्त्यात आडवी लावत ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केला. वाहनांची लांबलचक रांग लागल्याने काही काळासाठी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नागरिकांनी चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आक्रमक पवित्र्यातच असल्याचे सांगण्यात आले. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बघ्यांची गर्दी, प्रवाशांचा खोळंबाभररस्त्यात सुरू असलेल्या या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळपास अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. कार्यालयीन वेळ संपल्यानंतरचा कालावधी असल्याने अनेकांना घरी पोहोचण्यास उशीर झाला.कारवाईकडे लक्षघटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता पोलिसांकडूनया मद्यधुंद चालकावर कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk অটো driver creates chaos in Pimpri, traffic halted.

Web Summary : A drunk auto driver caused a ruckus in Pimpri, blocking traffic at Dange Chowk for half an hour. The incident caused traffic jams and inconvenience to commuters. Locals demand strict action against the driver.
टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड